शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाटेतच पेट्रोल संपले तर...; हे इमर्जन्सी नंबर सेव्ह करून ठेवा, लागलीच मदत मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 17:07 IST

हे इमर्जन्सी नंबर लक्षात ठेवा. लागलीच मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल. नॅशनल हायवेंवर तुम्हाला काही सुविधा मोफत मिळतात.

कुटुंबासोबत किंवा एकटे प्रवासाला निघाला आहात आणि दूर दूरवर पेट्रोल पंप नाहीय, तुमच्या वाहनातील इंधन संपले किंवा अपघात झाला किंवा नादुरुस्त झाले तर राष्ट्रीय हायवेवर कोणा कुणाचे नसते. अशावेळी काय कराल? हे इमर्जन्सी नंबर लक्षात ठेवा. लागलीच मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल. नॅशनल हायवेंवर तुम्हाला काही सुविधा मोफत मिळतात. तुम्ही अनेक रस्त्यांवर टोल भरता. त्याचा वापर करा. टोल कंपन्या काही सेवा देखील देतात. परंतू, तुम्हाला याची माहिती असली पाहिजे. 

हायवेवरून जात असताना गाडीतील इंधन संपले तर गाडी साईडला लावा आणि टोल पावती हातात घ्या. त्यावर हेल्पलाईन नंबर दिलेला असतो. किंवा पेट्रोल नंबरही असतो. तुम्हाला काही लीटर पेट्रोल किंवा डिझेलची मदत केली जाईल. यासाठी तुम्हाला जादा पैसे मोजावे लागत नाहीत, तर पेट्रोलचे पैसे द्यावे लागतात. या मदतीसाठी तुम्ही 8577051000, 7237999944 या क्रमांकांवर फोन करू शकता. 

टोल हायवेवर वाहन नादुरुस्त झाले तर तुम्ही मॅकॅनिकची मदत घेऊ शकता. यासाठी 8577051000, 7237999955 हे हेल्पलाईन नंबर आहेत. मॅकॅनिक येण्याची सेवा मोफत आहे, परंतू दुरुस्त करण्याचा चार्ज घेतला जातो. तिथे दुरुस्त झाली नाही तर वाहन टो करून नेले जाते. याचाही खर्च असतो. 

मेडिकल इमर्जन्सीप्रवासावेळी कोणी आजारी पडले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेला 8577051000 आणि 7237999911 या हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करून तुम्ही मोफत रुग्णवाहिका मिळवू शकता. प्राथमिक उपचारासाठी देखील ही सोय आहे. 

वाटेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास, तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाइन क्रमांक 1033 किंवा 108 वर कॉल करू शकता. ही सेवा 24 तास सुरु असते.  

टॅग्स :highwayमहामार्गPetrolपेट्रोल