Hyundai ची 4 लाखांत नवी मायक्रो SUV येतेय; एकाच दगडात Maruti, Tata, Nissan सारखे पक्षी मारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 02:23 PM2021-04-27T14:23:14+5:302021-04-27T14:24:47+5:30

Hyundai is prepairing for AX1 Micro SUV launch Globally: ह्युंदाईने या कारचे सुरुवातीचे नाव AX1 ठेवले आहे. ही एक मायक्रो एसयुव्ही असणार आहे. जगभरात या कारचे वेगवेगळे व्हेरिअंट दिसले आहेत. तसेच सध्या या कारचे काही चोरून काढलेले फोटो, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. 

Hyundai's new micro SUV AX1 is coming, priced at Rs 4 lakh; will hit Maruti, tata, Nissan | Hyundai ची 4 लाखांत नवी मायक्रो SUV येतेय; एकाच दगडात Maruti, Tata, Nissan सारखे पक्षी मारणार

Hyundai ची 4 लाखांत नवी मायक्रो SUV येतेय; एकाच दगडात Maruti, Tata, Nissan सारखे पक्षी मारणार

googlenewsNext

Hyundai AX1 Micro SUV: देशात दोन नंबरची ऑटो कंपनी Hyundai स्वस्त किंमतीत एसयुव्ही आणण्याच्या तयारीला लागली आहे. निस्सान मॅग्नाईट, रेनॉच्या किगरसह मारुतीला टक्कर देण्यासाठी ह्युंदाई एक हॅचबॅक कार लाँच करणार आहे. कंपनीने या कारचे डिझाईनही बनविले असून या कारला जगभरातील रस्त्यांवर अनेकदा पाहिले गेले आहे. (Hyundai AXI Micro SUV Expected in India by late 2021 at price cap 4 lakhs onwords.)


ह्युंदाईने या कारचे सुरुवातीचे नाव AX1 ठेवले आहे. ही एक मायक्रो एसयुव्ही असणार आहे. जगभरात या कारचे वेगवेगळे व्हेरिअंट दिसले आहेत. तसेच सध्या या कारचे काही चोरून काढलेले फोटो, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. 

Kia India: कियाचा 'तहलका'! थोडं थांबा; Kia Seltos, Sonet चे नवे फेसलिफ्ट पुढील महिन्यात येणार


मारुतीकडे सध्या मस्क्युलर लुकमध्ये एस प्रेसो (maruti suzuki s presso) ही कार आहे. तर अन्य कंपन्यांकडे पाच लाखांपासून सुरु होणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहेत. यापेक्षा जास्त किंमतीत ह्युंदाईच्या हॅचबॅक कार आहेत. यामुळे ह्युंदाईला छोट्या मस्क्युलर कारची गरज भासत आहे. Hyundai AX1 Micro SUV चे डिझाईन हे एखाद्या एसयुव्हीप्रमाणे आहे. काही फोटोंनुसार ह्युंदाईच्या या कारचा रिअर लुक हा वेगळा आहे. यामध्ये एलईडी टेल लँपला पारंपरिक लुक देण्यात आला आहे. मात्र, टर्न इंडिकेटर गोलाकार आहेत जे बंपरवर देण्यात आले आहेत. तसेच ट्विन एक्झॉस्टही दिसला आहे.

 
या कारमध्ये दोन इंजिनचा पर्याय मिळू शकतो. Hyundai AX1 मध्ये 1.1 लीटर आणि 1.2 लीटरचे इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. 1.1 लीटर इंजिन 69 पीएस ताकद आणि 99 एनएम चा पीक टॉर्क उत्पन्न करेल. तसेच 1.2 लीटर इंजिन 83 पीएस ताकद आणि 113 एनएम चा पीक टॉर्क उत्पन्न करेल. दोन्ही इंजिनांना 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअर बॉक्स दिला जाणार आहे. 

Ather EV Scooter: एथर जोमात! मुंबईत उभारली १० चार्जिंग स्टेशन, कारही चार्ज करा; पहा लोकेशन...


किंमत?
महत्वाची बाब म्हणजे या कारची किंमत किती असेल...ह्युंदाई ही कार यंदा लाँच करण्याची शक्यता आहे. या कारची किंमती ४ लाखांच्या आसपास ठेवली जाणार आहे. ही अंदाजे किंमत असली तरीही मारुतीच्या ताफ्यातील इग्निस (Maruti Suzuki Ignis), एस प्रेसो आणि टाटाची आगामी टाटा हॉर्नबिल (Tata Hornbill) च्या तोडीला ही कार आणणार असल्याने कमी किंमतीतच उतरवावी लागणार आहे. 

Web Title: Hyundai's new micro SUV AX1 is coming, priced at Rs 4 lakh; will hit Maruti, tata, Nissan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.