शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भारतात लवकरच लाँच होणार Hyundai ची EV Ioniq 5; जबरदस्त लूक अन् डिझाईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:55 IST

ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनी (Hyundai Motor India Limited) यंदाच्या वर्षात अनेक उत्पादनं बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार Ioniq 5 चाही समावेश आहे.

ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनी (Hyundai Motor India Limited) यंदाच्या वर्षात अनेक उत्पादनं बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार Ioniq 5 चाही समावेश आहे. जी अलीकडेच भारतात चाचणी करताना पाहिली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक कारला रेट्रो डिझाईन थीम देण्यात आली असून ती जागतिक स्तरावर आधीच समोर आली आहे. नवीन इलेक्ट्रिक कार (Hyundai Ioniq 5) लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. ही कार चेन्नईच्या बाहेरील भागात दिसली आहे जिथे ब्रँडची श्रीपेरुंबदुर उत्पादन सुविधा आहे. Ioniq 5 हे E-GMP स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित कंपनीचे पहिले समर्पित इलेक्ट्रिक वाहन आहे.

युरोपियन कार ऑफ द इयर ठरलेली Kia EV6 शी बरेच साम्य ह्युंदाईच्या नव्या कारमध्ये असल्याचं बोललं जात आहे. Hyundai ने अलीकडेच भारतात शून्य उत्सर्जन वाहने आणण्याचा एक भाग म्हणून मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. 2028 पर्यंत किमान सहा नवीन EV कार आणण्याचं उद्दीष्ट कंपनीचं आहे. या श्रेणीमध्ये Ioniq 5 कारचाही समावेश असेल. 

Ioniq 5 चे डिझाइनIoniq 5 CBU मार्गाने देशात आणले जाऊ शकते आणि विशेषत: भारतासाठी विकसित केलेल्या अधिक व्हॉल्यूम-आधारित ईव्हीच्या आगमनापूर्वी ते फ्लॅगशिप इलेक्ट्रिक वाहन म्हणून बनवले जाऊ शकते. डिझाईनच्या बाबतीत, Ioniq 5 मध्ये एक यूनिक एक्सटीरियर पिक्सेलेटेड लाइट एलिमेंट, 20-इंच अलॉय व्हील, पॉप-आउट डोअर हँडल आणि चार्जिंग पोर्टसह 45 EV संकल्पना असू शकते. 

उपकरणांच्या यादीमध्ये ऑगमेंटेड रिअॅलिटी टेकसह हेड-अप डिस्प्ले आणि ट्विन-स्क्रीन सेटअप समाविष्ट आहे. इको-फ्रेंडलीवर जोर देऊन, Ioniq 5 सीट आणि इतर घटकांसाठी रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. 

Ioniq 5 ची वैशिष्ट्येHyundai Ioniq 5 एक फ्लॅट फ्लोअर कार आहे आणि आतील भागात भरपूर जागा उपलब्ध असणार आहे. कार ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर-असिस्टंट तसंच सुरक्षा तंत्रज्ञानासह देखील येते. जागतिक बाजारपेठेत ही 58 kWh आणि 72.6 kWh बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे. 800 व्होल्ट तंत्रज्ञान वापरून, ते 220 kW DC चार्जरद्वारे केवळ 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगAutomobileवाहन