शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

तुफान खप, तरीही Hyundai Creta चे डिझेल मॉडेल बंद झाले; कारण वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 15:08 IST

Hyundai Creta Diesel : नवीन क्रेटा लाँच झाली तेव्हा तिचे E, EX, S, SX आणि SX (O) व्हेरिअंट देण्यात आले होते. आता यापैकी ई व्हेरिअंट जे बेस मॉडेल आहे ते हटविण्यात आले आहे.

ह्युंदाईची क्रेटा (Hyundai Creta) ही एसयुव्ही सर्वाधिक पसंतीची कार बनली आहे. मात्र, ह्युंदाईने याचे डिझेलचे व्हेरिअंटच बंद केल्याने धक्का बसला आहे. ह्युंदाईने ही कार 2015 मध्ये लाँच केली होती. तेव्हापासून ही कार ग्राहकांमध्ये कमालिची लोकप्रिय आहे. 2020 मध्ये या कारचे नवीन जनरेशन कंपनीने लाँच केले आहे. याला काही महिने होत नाहीत तोच कंपनीने Hyundai Creta चे E व्हेरिअंट बंद केले आहे. (Hyundai Creta Diesel E variant de-listed from company website)

Hyundai ने Creta चे E व्हेरिअंट वेबसाईटवरून हटविले आहे. नवीन क्रेटा लाँच झाली तेव्हा तिचे E, EX, S, SX आणि SX (O) व्हेरिअंट देण्यात आले होते. आता यापैकी ई व्हेरिअंट जे बेस मॉडेल आहे ते हटविण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आता केवळ पेट्रोल ई व्हेरिअंट उपलब्ध आहे. हे व्हेरिअंट ग्राहक 999,990 रुपये एक्स शोरुममध्ये खरेदी करू शकतात. 

GST E Way Bill: ट्रक, टेम्पो चालक-मालकांनो! दिवसाला 200 किमींचे अंतर कापावेच लागणार, नाहीतर...

काही काळापूर्वी कंपनीने माहिती दिलेली की, क्रेटाच्या डिझेल मॉडेलची मोठा मागणी आहे. 100 पैकी डिझेल 60 आणि पेट्रोलच्या 40 गाड्या विकल्या जातात. मागणी वाढत चालल्याने डिझेल ई व्हेरिअंटचा वेटिंग पिरिएड हा 10 महिन्यांपेक्षा जास्त गेला आहे. यामुळे कंपनीने हे मॉडेल वेबसाईटवरून हटविले आहे. हेच यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. 

जगज्जेती Apple नव्या क्षेत्रात, इलेक्ट्रीक कार येणार; ह्युंदाई, कियाला बसला जबरदस्त 'धक्का'

क्रेटाला तीन इंजिन प्रकारात लाँच करण्यात आले होते. 1.5 लीटर पेट्रोल, 1.4 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन असे होते. सर्व इंजिनना 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड देण्यात आला होता. तसेच 6-स्पीड ऑटोमेटिक आणि 7-स्पीड डीसीटी गियरबॉक्स देखील देण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये जेव्हा इतर कंपन्यांच्या कारची मागणी ठप्प झाली होती. तेव्हा क्रेटाची 55000 हून अधिक बुकिंग कंपनीने घेतल्या होत्या. ऑक्टोबर 2020 ला हीच बुकिंग 1.15 लाख वर गेली होती. जास्त मागणी झाली तर कंपन्यांनी खूश व्हायला हवे, मात्र इथे उलटेच झाले आहे. कंपनीने कारच बंद केली आहे. आता ही बंदी कायमची की तात्पुरती ते काही महिन्यांनीच समजू शकणार आहे. 

नव्या वर्षात मारुतीला जबर फटका; 'या' बनल्या सर्वाधिक खपाच्या कार...

ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित अन्य बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा... 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईDieselडिझेल