तुफान खप, तरीही Hyundai Creta चे डिझेल मॉडेल बंद झाले; कारण वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:02 PM2021-02-06T15:02:14+5:302021-02-06T15:08:51+5:30

Hyundai Creta Diesel : नवीन क्रेटा लाँच झाली तेव्हा तिचे E, EX, S, SX आणि SX (O) व्हेरिअंट देण्यात आले होते. आता यापैकी ई व्हेरिअंट जे बेस मॉडेल आहे ते हटविण्यात आले आहे.

Hyundai Creta's diesel model E variant de-listed from company website, know reason | तुफान खप, तरीही Hyundai Creta चे डिझेल मॉडेल बंद झाले; कारण वाचून हैराण व्हाल

तुफान खप, तरीही Hyundai Creta चे डिझेल मॉडेल बंद झाले; कारण वाचून हैराण व्हाल

googlenewsNext

ह्युंदाईची क्रेटा (Hyundai Creta) ही एसयुव्ही सर्वाधिक पसंतीची कार बनली आहे. मात्र, ह्युंदाईने याचे डिझेलचे व्हेरिअंटच बंद केल्याने धक्का बसला आहे. ह्युंदाईने ही कार 2015 मध्ये लाँच केली होती. तेव्हापासून ही कार ग्राहकांमध्ये कमालिची लोकप्रिय आहे. 2020 मध्ये या कारचे नवीन जनरेशन कंपनीने लाँच केले आहे. याला काही महिने होत नाहीत तोच कंपनीने Hyundai Creta चे E व्हेरिअंट बंद केले आहे. (Hyundai Creta Diesel E variant de-listed from company website)


Hyundai ने Creta चे E व्हेरिअंट वेबसाईटवरून हटविले आहे. नवीन क्रेटा लाँच झाली तेव्हा तिचे E, EX, S, SX आणि SX (O) व्हेरिअंट देण्यात आले होते. आता यापैकी ई व्हेरिअंट जे बेस मॉडेल आहे ते हटविण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आता केवळ पेट्रोल ई व्हेरिअंट उपलब्ध आहे. हे व्हेरिअंट ग्राहक 999,990 रुपये एक्स शोरुममध्ये खरेदी करू शकतात. 

GST E Way Bill: ट्रक, टेम्पो चालक-मालकांनो! दिवसाला 200 किमींचे अंतर कापावेच लागणार, नाहीतर...


काही काळापूर्वी कंपनीने माहिती दिलेली की, क्रेटाच्या डिझेल मॉडेलची मोठा मागणी आहे. 100 पैकी डिझेल 60 आणि पेट्रोलच्या 40 गाड्या विकल्या जातात. मागणी वाढत चालल्याने डिझेल ई व्हेरिअंटचा वेटिंग पिरिएड हा 10 महिन्यांपेक्षा जास्त गेला आहे. यामुळे कंपनीने हे मॉडेल वेबसाईटवरून हटविले आहे. हेच यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. 

जगज्जेती Apple नव्या क्षेत्रात, इलेक्ट्रीक कार येणार; ह्युंदाई, कियाला बसला जबरदस्त 'धक्का'


क्रेटाला तीन इंजिन प्रकारात लाँच करण्यात आले होते. 1.5 लीटर पेट्रोल, 1.4 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन असे होते. सर्व इंजिनना 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड देण्यात आला होता. तसेच 6-स्पीड ऑटोमेटिक आणि 7-स्पीड डीसीटी गियरबॉक्स देखील देण्यात आला होता. 
लॉकडाऊनमध्ये जेव्हा इतर कंपन्यांच्या कारची मागणी ठप्प झाली होती. तेव्हा क्रेटाची 55000 हून अधिक बुकिंग कंपनीने घेतल्या होत्या. ऑक्टोबर 2020 ला हीच बुकिंग 1.15 लाख वर गेली होती. जास्त मागणी झाली तर कंपन्यांनी खूश व्हायला हवे, मात्र इथे उलटेच झाले आहे. कंपनीने कारच बंद केली आहे. आता ही बंदी कायमची की तात्पुरती ते काही महिन्यांनीच समजू शकणार आहे. 

नव्या वर्षात मारुतीला जबर फटका; 'या' बनल्या सर्वाधिक खपाच्या कार...

ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित अन्य बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा... 

Web Title: Hyundai Creta's diesel model E variant de-listed from company website, know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.