Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?

By जयदीप दाभोळकर | Updated: December 18, 2025 12:44 IST2025-12-18T12:43:07+5:302025-12-18T12:44:19+5:30

Car 360 Degree Camera: गाड्या आता केवळ वेगासाठी नाही, तर सुरक्षिततेसाठी ओळखल्या जात आहेत. सध्या '३६० डिग्री कॅमेरा' हे फीचर प्रीमियम गाड्यांसोबतच आता मध्यम बजेटमधील गाड्यांमध्येही उपलब्ध होत आहे. जर तुमच्या कारमध्ये हे फीचर नसेल तर पाहूया काय आहे हे फीचर आणि कोणते ३६० डिग्री कॅमेरे तुमच्यासाठी ठरू शकतात बेस्ट.

How useful is it to have a 360 degree camera in a car How exactly does it work and what does it do | Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?

Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?

Car 360 Degree Camera: गेल्या काही वर्षांत ऑटोमोबाईल क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय. गाड्या आता केवळ वेगासाठी नाही, तर सुरक्षिततेसाठी ओळखल्या जात आहेत. सध्या '३६० डिग्री कॅमेरा' हे फीचर प्रीमियम गाड्यांसोबतच आता मध्यम बजेटमधील गाड्यांमध्येही उपलब्ध होत आहे. ड्रायव्हिंग सोपं आणि सुरक्षित बनवण्यात या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. पण आजही अशा अनेक बजेट फ्रेंडली कार्स आहेत ज्यामध्ये ३६० डिग्री कॅमेरा मिळत नाही. यामुळेच तो बाहेरन खरेदी करावा लागतो.

३६० डिग्री कॅमेरा म्हणजे नक्की काय?

३६० डिग्री कॅमेरा म्हणजे नक्की काय आणि तो कसा काम करतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. साध्या रिव्हर्स कॅमेरामध्ये आपल्याला फक्त गाडीच्या मागचा भाग दिसतो. मात्र, ३६० डिग्री कॅमेरा सिस्टीममध्ये गाडीच्या चारही बाजूंना कॅमेरे बसवलेले असतात. सहसा एक कॅमेरा पुढील ग्रीलमध्ये, एक मागे आणि दोन कॅमेरे बाजूच्या आरशांच्या (ORVMs) खाली असतात. हे चारही कॅमेरे मिळून मिळवलेली माहिती एकत्र करतात आणि गाडीच्या इन्फोटेनमेंट स्क्रीनवर गाडीचा 'बर्ड्स आय व्ह्यू' म्हणजेच जणू काही आपण गाडीला वरून पाहत आहोत, असा व्हिडिओ दाखवतात.

Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली

३६० डिग्री कॅमेराचे मुख्य फायदे

अरुंद जागेत पार्किंग करणं सोपं: शहरांमधील गर्दीच्या ठिकाणी किंवा अरुंद पार्किंग स्लॉटमध्ये गाडी लावणं कठीण असतं. ३६० डिग्री कॅमेरामुळे गाडीच्या चारही बाजूंना किती जागा शिल्लक आहे, हे ड्रायव्हरला अचूक समजतं. यामुळे गाडी भिंतीला किंवा दुसऱ्या वाहनाला घासण्याचा धोका कमी होतो.

ब्लाईंड स्पॉट्स वर नियंत्रण: गाडी चालवताना असे अनेक भाग असतात जे आरशातून दिसत नाहीत. यालाच 'ब्लाईंड स्पॉट्स' म्हणतात. ३६० डिग्री कॅमेरा या भागांमधील अडथळे किंवा वस्तू स्पष्टपणे दाखवतो, ज्यामुळे अपघात टळतात.

लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षा: अनेकदा गाडी रिव्हर्स घेताना गाडीच्या मागे किंवा बाजूला असलेली लहान मुले किंवा पाळीव प्राणी ड्रायव्हरला दिसत नाहीत. या तंत्रज्ञानामुळे गाडी सुरू करण्यापूर्वीच आजूबाजूचा परिसर पूर्णपणे तपासता येतो.

गाडीचं नुकसान टळतं: छोट्या गल्ल्यांमधून गाडी नेताना किंवा वळवताना गाडीला डेंट किंवा स्क्रॅचेस येण्याची भीती असते. ३६० डिग्री व्ह्यूमुळे गाडीचे अशा प्रकारच्या किरकोळ नुकसानीपासून संरक्षण होते, ज्यामुळे भविष्यातील दुरुस्तीचा खर्च वाचतो.

ऑफ-रोडिंगमध्ये उपयुक्त: खडबडीत रस्त्यांवर किंवा डोंगराळ भागात गाडी चालवताना टायरच्या खाली नेमका कोणता अडथळा किंवा दगड आहे, हे पाहण्यासाठी या कॅमेराचा मोठा फायदा होतो.

सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचं पाऊल

आजच्या काळात रस्ते अपघातांचे प्रमाण पाहता, गाड्यांमध्ये सेफ्टी फीचर्स असणं अनिवार्य झाले आहे. ३६० डिग्री कॅमेरा केवळ ड्रायव्हरचा ताण कमी करत नाही, तर रस्त्यावरुन चालणाऱ्यांच्या सुरक्षिततेतही भर टाकतो. विशेषतः मोठ्या आकाराच्या एसयूव्ही गाड्यांमध्ये जिथे गाडीच्या सभोवतालचा अंदाज घेणे कठीण असते, तिथे हे फीचर एखाद्या वरदानासापेक्षा कमी नाही. त्यामुळे गाडीत इंजिन आणि मालयेज सारख्या महत्त्वाच्या बाबींसोबतच ३६० डिग्री कॅमेरा सारखी सेफ्टी फीचर्सदेखील तुमचा ताण कमी करू शकतात.

कोणते कॅमेरे ठरू शकतात बेस्ट?

Metaflix 360° Car 4‑Way Camera Kit 1080P 

QIWA 360 Degree Dash Camera for Car with Night Vision

Blaupunkt Car BP 3600 HD 360-Degree Car Camera System

DEVIANT 360 Degree Dash Camera

Web Title: How useful is it to have a 360 degree camera in a car How exactly does it work and what does it do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.