काही महिन्यांपूर्वी टेस्लाने आपली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली होती. टेस्ला मॉडेल वाय ही कार भारतात ६० लाखांपासून उपलब्ध आहे. ही कार किती सुरक्षित आहे, हे अद्याप समोर आले नव्हते. युरोप बाजारात या कारची क्रॅश टेस्ट करण्यात आली आहे.
युरोपच्या प्रतिष्ठित सुरक्षा रेटिंग एजन्सी Euro NCAP ने नुकत्याच घेतलेल्या क्रॅश टेस्टमध्ये मॉडेल Y ला ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. ही रेटिंग लेफ्ट हँड ड्राइव्ह आणि राईट हँड ड्राइव्ह अशा दोन्ही आवृत्त्यांना लागू आहे. भारतात राईट हँड ड्राईव्ह कार वापरली जाते.
सुरक्षिततेचे मापदंडEuro NCAP ने जाहीर केलेल्या गुणांनुसार, टेस्ला मॉडेल Y ने जवळपास प्रत्येक सुरक्षा श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे:
प्रौढ प्रवाशांचे संरक्षण : ९१% गुण
बाल प्रवाशांचे संरक्षण : ९३% गुण (सर्वोत्तम स्कोअर)
इतर रस्ते वापरकर्त्यांचे संरक्षण: ८६% गुण
सेफ्टी असिस्ट फीचर्स: ९२% गुण
मागील बाजूच्या धडकेत होणाऱ्या व्हिपलॅश सुरक्षा चाचणीत मॉडेल Y ला ४ पैकी पूर्ण ४ गुण मिळाले आहेत. तसेच, बालकांच्या संरक्षण चाचणीत (फ्रंटल आणि लॅटरल इम्पॅक्ट) पूर्ण गुण मिळाल्याने ही एसयूव्ही कुटुंबांसाठी एक अत्यंत सुरक्षित पर्याय ठरली आहे.
टेक्नोलॉजी आणि भारतातील किंमतउत्कृष्ट सुरक्षा रेटिंगसह, टेस्ला मॉडेल Y अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्सने सुसज्ज आहे. यात १५.४ इंचाचा मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग सारख्या महत्त्वाच्या सुरक्षा सुविधांचा समावेश आहे. मॉडेल Y सिंगल चार्जवर ५०० किलोमीटर ते ६२२ किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ही प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही जुलै महिन्यात भारतीय बाजारात ₹५९.८९ लाख (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च झाली आहे.
Web Summary : Tesla Model Y, launched in India, earns a 5-star Euro NCAP safety rating. It excels in adult, child, and pedestrian protection. The electric SUV boasts impressive scores and advanced safety features. Indian price starts at ₹59.89 lakh.
Web Summary : भारत में लॉन्च हुई टेस्ला मॉडल Y को यूरो NCAP में 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिली। वयस्क, बच्चे और पैदल चलने वालों की सुरक्षा में उत्कृष्ट। इलेक्ट्रिक एसयूवी प्रभावशाली स्कोर और उन्नत सुरक्षा सुविधाओं से लैस। भारतीय कीमत ₹59.89 लाख से शुरू।