शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

कडक लूक आणि डिझाईन, सिंगल चार्जवर ३०० किमीची रेंज; पाहा जबरदस्त Electric Scooter

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 13:10 IST

जगभरात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन व्हेईकल्स लाँच करत आहेत.

जगभरात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन व्हेईकल्स लाँच करत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन दुचाकी उत्पादक कंपनीने आपली पहिली मॅक्सी इलेक्ट्रीक स्कूटर EICMA ऑटो शोमध्ये सादर केली आहे. कंपनीने या स्कूटरला Senmenti 0 असे नाव दिले आहे. हॉर्विनचा दावा आहे की ही स्कूटर रायडर्ससाठी खूप खास ठरेल. तसेच, त्याचे डिझाइन पॉवरट्रेन आणि स्पेसिफिकेशन इतर स्कूटरपेक्षा वेगळे असेल.

हॉर्विन ही ऑस्ट्रेलियन दुचाकी उत्पादक कंपनी आहे. त्याने 2019 मध्ये पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली. त्याला CR6 Pro असे नाव देण्यात आले होते. दुसरीकडे, हॉर्विनची पहिली मॅक्सी इलेक्ट्रीक स्कूटर ही Senmenti 0 400 V आर्किटेक्चरवर आधारित स्कूटर आहे. यामध्ये 0 ते 80 टक्के चार्जिंग अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होईल. त्याचबरोबर वेगाच्या बाबतीत ही इतर स्कूटर्सपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध होईल. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग केवळ 2.5 सेकंदात पकडण्यास सक्षम आहे. तसेच, ते सरासरी 80 किमी प्रतितास वेगाने जास्तीत जास्त अंतर कापेल. या स्कूटरचा टॉप स्पीड 200 किमी प्रति तास आहे. त्याचवेळी, कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही स्कूटर एका चार्जमध्ये 300 किलोमीटरचे अंतर कापू शकेल.

हे फीचर्स मिळणारSenmenti 0 मध्ये 30 सेन्सर्स आणि कॅमेरे देण्यात आले आहेत, जे रिअल टाइम  इन्फॉर्मेशन प्रदान करतील. यात एबीएस, अँटी स्लिप सिस्टीम, टायर प्रेशर मॉनिटरिंग, कोलिजन अलर्ट देखील आहे. ही सर्व वैशिष्ट्ये रायडर्सचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक चांगला करतील. तसेच त्यांची सेफ्टी लेव्हलही वाढवतील. याशिवाय या स्कूटरमध्ये हिल क्लाइंब असिस्ट, स्टार्ट आणि रिव्हर्स असिस्टंट, हीटेग ग्रिप्स आणि कीलेस गो सारखी वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने या स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड दिले आहेत. ट्रॅक्शन कंट्रोल, हीटेड सीट्स, टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि अॅडजस्टेबल विंडस्क्रीन देखील देण्यात आलेले आहेत.

… तरी परफॉर्मन्स तसाच राहिलहॉर्विनच्या मते, बॅटरी कमी असली तरी या स्कूटरच्या कामगिरीवर फारसा परिणाम होणार नाही. यात रेंज एक्स्टेन्डर फीचर देखील उपलब्ध आहे, जे अशा परिस्थितीत रायडरला जास्त अंतर कापण्यास मदत करेल. या फंक्शनचा वापर करून स्कूटरची रेंज किती वाढवली जाऊ शकेल याबद्दल अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार बॅटरी पॅकचा वापर पॉवर सोर्स म्हणून करता येऊ शकतो.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAustraliaआॅस्ट्रेलिया