शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

होंडा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये करणार धमाका, पुढील ५ वर्षांसाठी कंपनी आखतेय नवा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:37 IST

यावर्षीच्या ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये होंडाने आपल्या दोन नवीन टू-व्हीलर लाँच केल्या आहेत.

नवी दिल्ली : होंडा (Honda) कंपनीने आधीच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांनाही खूप लोकप्रियता मिळाली आहे. अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक बाजारात येण्यापूर्वी होंडाने इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. यावर्षीच्या ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये होंडाने आपल्या दोन नवीन टू-व्हीलर लाँच केल्या आहेत. होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आणि क्यूसी १ या दोन्ही गाड्या बाजारात आल्या आहेत. 

रिपोर्टनुसार, होंडा भारतात ईव्ही उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे, जो २०२८ मध्ये सुरू होऊ शकतो. कंपनीने पुढील ५ वर्षांसाठी तयारी केली आहे. येत्या ५ वर्षांत कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करणार आहे. होंडाच्या १० नवीन इलेक्ट्रिक गाड्या भारतीय बाजारात येऊ शकतात. यापैकी चार वाहने पुढील दोन वर्षांत लाँच केली जाऊ शकतात. होंडा आपल्या वाहनांच्या निर्मितीसाठी भारतात एक प्लांट स्थापन करणार आहे. 

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. येत्या काही वर्षांत भारत ईव्ही हब बनू शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, २०२५ ते २०२७ या काळात होंडा कोणती वाहने लाँच करणार आहे, हा प्रश्न तुम्हाल पडला असेल. तर कंपनीने अद्याप त्याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र, कंपनी दरवर्षी ४ मॉडेल बाजारात आणू शकते. यासह, तीन लाख युनिट्सच्या विक्रीचे टारगेट ठेवले जाऊ शकते. होंडाचे हे टारगेट नवीन वाहनाच्या विक्रीबाबत असू शकते.

होंडा इलेक्ट्रिक स्कूटर्सहोंडा कंपनीने बाजारात अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आणि QC1 लाँच करून आपली ग्रँड स्कीमची सुरूवात केली आहे. कंपनीने आपले हे मॉडेल्स लिमिटेड फीचर्ससह बाजारात आणले आहेत. परंतु येणाऱ्या नवीन मॉडेल्समध्ये अॅडव्हॉन्स फीचर्स असू शकतात.

टॅग्स :Hondaहोंडाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर