Honda Cars India launches new Honda Jazz 2018 | होंडा कार इंडियाची नवी ‘होंडा जॅझ २०१८’ लाँच

होंडा कार इंडियाची नवी ‘होंडा जॅझ २०१८’ लाँच

पुणे : भारतातील प्रवासी कारचे अग्रणी निर्माता होंडा कार इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) यांनी उत्तम स्टाईल, सर्वोत्तम इंटेरियर आणि अधिक सुरक्षा या विशेषतांसह नवी होंडा जॅझ २०१८ ही कार लाँच केली.
नवीन जॅझ मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पेट्रोलमध्ये २ ग्रेड - व्ही आणि व्हीएक्स आणि डिझेल मध्ये ३ ग्रेड- एसव्ही तसेच व्हीएक्समध्ये उपलब्ध आहे. बाजारात आॅटोमॅटिक्सची वाढती मागणी पाहता नवीन होंडा जॅझ पेट्रोलमध्ये व्ही तसेच व्हीएक्स ग्रेडमध्ये प्रगत तंत्रज्ञानासह उपलब्ध होईल. नव्या होंडा जॅझच्या कलर लाईनअपचेसुद्धा नवनिर्माण करण्यात आले आहे. तसेच, नवीन मॉडेल ५ बाह्यरंगात - रेडिएंट रेड मेटॅलिक (नवीन), लुनार सिल्व्हर मेटॅलिक (नवीन) मॉडर्न स्टील मेटॅलिक, गोल्डन ब्राऊन मेटॅलिक तसेच व्हाईट आॅर्किड पर्लसह प्रीमियम बीज इंटिरियरमध्ये येत आहेत.
जॅझ २०१८च्या लाँचच्या बाबतीत होंडा कार इंडिया लिमिटेडचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट तथा डायरेक्टर सेल्स आणि मार्केटिंग राजेश गोयल म्हणाले, की आम्हाला प्रगत वैशिष्ट्ये असलेली नवीन होंडा खअ‍े २०१८ सादर करण्यात आनंद वाटतो.
ग्राहकांचा आॅटोमॅटिक्सकडे वाढता कल पाहता, जॅझ २०१८ आता पेट्रोल रेंजमध्ये प्रगत सीव्हीटी तंत्रज्ञानासह येत आहे; जी आरामदायी तसेच सोप्या ड्राईव्हसाठी आॅटोमॅटिक ट्रान्समिशन कार पसंत करणाऱ्या ग्राहकांकरिता एक उत्तम पर्याय देईल. (वा.प्र.)

Web Title: Honda Cars India launches new Honda Jazz 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.