शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात कार खरेदीची शानदार संधी, Honda Cars वर मिळतोय बंपर डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 18:57 IST

Honda cars Price : अनेक होंडा कारवर तुम्ही 45000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये रोख सवलतीपासून ते अॅक्सेसरीज ऑफरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

Honda cars Price : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) काही निवडक मॉडेल्सवर डिस्काउंट ऑफर दिली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत कार खरेदी करू शकता. 

अनेक होंडा कारवर तुम्ही 45000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये रोख सवलतीपासून ते अॅक्सेसरीज ऑफरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. तसेच,  होंडाने ज्या गाड्यांवर सूट दिली आहे, त्यात Jazz, WR-V, City, 4th जनरेशन सिटी आणि Amaze यांचा समावेश आहे. या सर्व ऑफर केवळ 31 डिसेंबरपर्यंत आहेत.

न्यू होंडा जॅझ (Honda Jazz Price)होंडा कंपनीच्या नवीन न्यू होंडा जॅझ (Honda Jazz) वर ​​35147 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये तुम्हाला 10000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 12147 रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज मिळू शकतात. याशिवाय, तुम्ही 5000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देखील घेऊ शकता. कंपनी आपल्या ग्राहकांना 5000 रुपयांची होंडा ग्राहक लॉयल्टी बोनस देत आहे. होंडा कार एक्सचेंज तुम्ही नवीन कारच्या खरेदीवर 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट सुद्धा घेऊ शकता.

होंडा डब्ल्यूआर-व्ही (Honda WR-V Price)होंडा डब्ल्यूआर-व्हीवर 28000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळत आहे. या डिस्काउंटमध्ये 9000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट,  5000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 10000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देण्यात आला आहे.  होंडा डब्ल्यूआर-व्हीवर कॅश डिस्काउंट नाही.

न्यू होंडा अमेज (Honda Amaze Price)तुम्ही होंडा कारच्या सेडान न्यू होंडा अमेजवर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 15000 रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील घेऊ शकता. यामध्ये होंडा 5,000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 6000 रुपयांचा होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे.

न्यू होंडा सिटी (Honda City Price)होंडाच्या अतिशय लोकप्रिय सेडान ऑल न्यू होंडा सिटीवर 45,108 रुपयांची ऑफरही दिली जात आहे. होंडा सिटी कार एक्सचेंजवर 30 हजार रुपयांचा लाभ मिळेल. यामध्ये 7500 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 8108 रुपयांपर्यंतच्या FOC अॅक्सेसरीज, 15,000 रुपयांपर्यंतच्या कार एक्सचेंजवर डिस्काउंट, 5000 रुपये होंडा ग्राहक लॉयल्टी बोनस, 9000 रुपये होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.

होंडा सेडान – 4th जनरेशनहोंडाच्या सेडान – 4th जनरेशन कारवर 22 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 9000 रुपये होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 8000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंटचा लाभ मिळत आहे.

टॅग्स :HondaहोंडाcarकारAutomobileवाहन