शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Honda कडून नवीन SUV चे नाव घोषित; वाचा कधी लाँच होणार? काय असतील फीचर्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 11:43 IST

होंडाचे भारतीय युनिट होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) लवकरच एक नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात आणणार आहे.

जपानी कार निर्माता कंपनी होंडा (Honda) ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आतापर्यंत नवनवीन एसयूव्ही, सेडान आणि हॅचबॅक कार्स बाजारात लॉन्च केल्या आहेत. दरम्यान, होंडाचे भारतीय युनिट होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) लवकरच एक नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात आणणार आहे. त्यामध्ये आपल्याला नवीन फीचर्स आणि अपडेटेड इंजिन आणि अन्य गोष्टी पाहायला मिळतील.

भारतातील प्रिमियम कार्सच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने एक घोषणा केली आहे. कंपनीच्या आगामी लॉन्च होणाऱ्या एसयूव्हीला होंडा एलिव्हेट (Honda Elevate) असे नाव देण्याची घोषणा होंडा कंपनीने केली आहे. होंडा एलिव्हेट ही कंपनीची नवीन माध्यम आकाराची एसयूव्ही आहे. या एसयूव्हीचा पुढील महिन्यामध्ये भारतात वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. हे मॉडेल जागतिक मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे.

ऑल न्यू एलिव्हेट हे मॉडेल एक आदर्श शहरी एसयूव्ही लॉन्च करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते. जे जीवनामध्ये चांगल्या गोष्टींसाठी आकर्षित करते. जगभरातील एसयूव्ही ची मागणी पूर्ण करण्यासाठी होंडा एलिव्हेट हे नवीन जागतिक मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे. नवीन मॉडेलमध्ये लोकांच्या जीवनशैलीच्या गरजा आणि होंडाच्या नवीन एसयूव्ही बद्दलच्या त्यांच्या अपेक्षांचा समावेश करण्यात आला आहे. भारत ही पहिली बाजारपेठ असणार आहे, जिथे होंडा एलिव्हेट लॉन्च होणार आहे.

कधी होणार लाँच?ही एसयूव्ही पुढील महिन्यात लाँच होणार असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे. तसेच,कंपनी 6 जून रोजी ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, कंपनीकडून नेमकी तारीख अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनीने ते जागतिक मॉडेल म्हणून तयार केले आहे. अशा स्थितीत भारतासोबतच इतर अनेक बाजारपेठांमध्ये हे लॉन्च केले जाऊ शकते.

काय असतील फीचर्स?कारचे फीचर्स आणि इतर माहिती कंपनीने अद्याप शेअर केलेली नाही. मात्र, LED DRL, LED लाइट्स, सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री, वायरलेस चार्जर, ABS, EBD, हिल स्टार्ट असिस्ट, TPMS, एअरबॅग्ज, 1.5L इंजिनसह अनेक फीचर्स दिले जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :AutomobileवाहनHondaहोंडा