सणासुदीच्या काळात नवीन सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असालेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होन्डा कार्स इंडियाने त्यांची लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान अमेझला अधिक स्टायलिश बनवले आहे. कंपनीने त्यात एक नवीन क्रिस्टल ब्लॅक पर्ल रंग जोडला आहे, जो कारला आणखी प्रीमियम आणि स्पोर्टी लूक देतो. अलिकडे, काळा रंग तरुण ग्राहकांची पहिली पसंती बनला आहे, अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने होंडा अमेझ क्रिस्टल ब्लॅक पर्ल बाजारात सादर केली.
होंडा अमेझ तिच्या मजबूत डिझाइन, प्रगत सेक्युरिटी फीचर्स आणि मोठ्या स्पेससाठी ओळखली जाते. पॉवरट्रेन म्हणून, कारमध्ये १.२-लिटर, ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे ९०bhp पॉवर आणि ११०Nm टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, मॅन्युअल आवृत्ती १८.६५ किमी प्रति लिटर आणि सीव्हीटी आवृत्ती १९.४६ किमी प्रतिलिटर पर्यंत देते.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तिसऱ्या पिढीतील होंडा अमेझ ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात किफायतशीर कार आहे, ज्यामध्ये लेव्हल-२ एडीएएस टेक्नोलॉजी आहे. या अपडेटनंतर, अमेझ आता सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, यात लूनर सिल्व्हर, मेटेरॉइड ग्रे, प्लॅटिनम व्हाइट, गोल्डन ब्राउन, रेडियंट रेड, ऑब्सिडियन ब्लू आणि नवीन क्रिस्टल ब्लॅक पर्ल यांचा समावेश आहे. ही कार व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्समध्ये या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.