मुंबई - अलीकडच्या काळात लहान मुलांमधील बाईकचं क्रेझ चांगलेच वाढले आहे. त्यात दुचाकी उत्पादनातील प्रसिद्ध हिरो कंपनीनं Vida Dirt.E K3 ही नवीन बाईक लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे ही बाईक ४ ते १० वर्षातील वयोगटातील मुलांसाठी खास बनवण्यात आली आहे.
काय आहेत वैशिष्टे?
Vida Dirt.E K3 मध्ये ३६० WH ची Removable Lithium-ion बॅटरी वापरली आहे, जी बाईकमधून काढता येते आणि घरी सहज चार्ज करता येते. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी साधारण २-३ तास लागतात. या बॅटरीसोबतच 500 W पॉवरची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी लहान मुलांना सुरक्षित राइडिंगचा अनुभव देते. एकदा चार्ज केल्यावर २-३ तास चालवू शकता. विशेष म्हणजे ४ ते १० वर्ष वयोगटातील मुलांसाठी ही बाईक डिझाईन करण्यात आली आहे. त्यात त्रिस्तरीय एडजस्टेबल सिस्टम आहे. स्मॉल, मीडियमआ आणि लार्ज यामुळे सीट, हँडलबार आणि व्हीलबेस उंचीनुसार कमी जास्त वाढवता येतात.
सीटची हाइट साधारण 454 mm ते 631 mm पर्यंत एडजस्ट होऊ शकते. वजन फक्त २२ किलो आहे. त्यामुळे मुलांसाठी बाईक हाताळणं सोपं आहे. या बाईकमध्ये तीन वेगवेगळे मोड दिले आहेत. त्यामुळे स्पीडवर कंट्रोल करता येते. त्यात Low Mode मध्ये सुमारे ८ किमी प्रतितास, मध्यम मोडमध्ये १६-१७ किमी प्रतितास आणि हाय मोडमध्ये २५ किमी प्रतितास इतका वेग आहे. हिरो Vida ने मुलांच्या सुरक्षेवरही भर दिला आहे.
Magnetic Kill Switch: जर राईडर सडलवरून खाली पडला, तर त्वरित मोटर पॉवर कट होते.
Chest Pad: हँडलबारवर Impact cushion pad जे धडक झाल्यास संरक्षण देतो.
Removable Footpegs: पायाचे पीग काढता/लावता येतात, जे मुलांना नियंत्रित करते.
Rear Brake: स्टँडर्ड रियर ब्रेक, अगदी मागील व्हीलवर चांगले ब्रेकिंग आहे.
दरम्यान, या बाईकसाठी मोबाईल APP सपोर्ट मिळतो. ज्यामुळे मुलांचे पालक स्पीड लिमिट सेट करू शकतात. राईड डेटा पाहू शकतात. त्याशिवाय एक्सेलेरेशन रिस्पॉन्स मॉनिटर करू शकतात. या Dirt.E K3 ला Red Dot Design Award 2025 आणि CES Innovation Award Honoree 2026 सारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत, जे त्याच्या डिझाईन आणि नव्या इनोवेशनला जागतिक पातळीवर मान्यता देतात.
कधीपासून खरेदी करता येणार, किंमत काय असेल?
लहान मुलांची ही बाईक १५ जानेवारी २०२६ पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. सुरुवातीला दिल्ली, बंगळुरू, पुणे, जयपूर आणि कालिकूट या शहरात ती विक्रीस उपलब्ध असेल. या बाईकची एक्स शोरूम किंमत ६९,९९० रूपये आहे. ही किंमत पहिल्या ३०० युनिटसाठी वैध असेल असं कंपनीने सांगितले आहे.
Web Summary : Hero has launched the Vida Dirt.E K3, an e-bike for kids aged 4-10. It features a removable battery, adjustable settings, multiple speed modes, and safety features. Available from January 15, 2026, starting at ₹69,990.
Web Summary : हीरो ने 4-10 वर्ष के बच्चों के लिए Vida Dirt.E K3 ई-बाइक लॉन्च की। इसमें रिमूवेबल बैटरी, एडजस्टेबल सेटिंग्स, कई स्पीड मोड और सुरक्षा सुविधाएँ हैं। यह 15 जनवरी, 2026 से ₹69,990 की शुरुआती कीमत पर उपलब्ध होगी।