शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिरोने नवीन Splendor केली लाँच, मायलेज 70kmpl, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 20:53 IST

Hero Super Splendor XTEC launched : आतापर्यंत हिरो आपल्या 100cc बाईक फक्त XTEC व्हेरिएंटमध्ये विकत होती. 

नवी दिल्ली : दिग्गज दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पसाठी (Hero MotoCorp)  हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) ही सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. कंपनी बाईकमध्ये सतत अपग्रेड करत राहते. कंपनी बाईक वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये विकते. आतापर्यंत हिरो आपल्या 100cc बाईक फक्त XTEC व्हेरिएंटमध्ये विकत होती. 

हिरोने आता XTEC व्हर्जनमध्ये 125cc असलेली सुपर स्प्लेंडर देखील लाँच केली आहे. हिरो सुपर स्प्लेंडर XTEC ला पॅशन XTEC च्या वर आहे. कंपनीने सुपर स्प्लेंडर XTEC ची ड्रम ब्रेक व्हेरिएंटसाठी किंमत 83,368 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटसाठी 87,268 रुपये  (दोन्ही किंमती एक्स-शोरूम) ठेवली आहे.

इंजिन आणि मायलेजयापूर्वी बाईक डीलर्सकडे दिसली होती. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये 124.7 cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7500 RPM वर 10.7 bhp पॉवर आणि 6000 RPM वर 10.6 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, सुपर स्प्लेंडर 68 किमी/लीटरचे फ्यूल इकॉनॉमी ऑफर करेल.

फीचर्सहिरो मोटोकॉर्पने आपल्या सुपर स्प्लेंडरसह 'सुपर' पॉवर, मायलेज, आराम आणि स्टाइलचा वादा केला आहे. आता या बाईकमध्ये फुली-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारख्या फीचर्ससह कनेक्टिव्हिटी फीचर्स जोडण्यात आली आहेत. यामध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, लो फ्यूल वॉर्निंग, सर्व्हिस रिमाइंडर, मालफंक्शन इंडिकेटर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. XTEC सूटसह कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये ब्लूटूथ पेअरिंग, कॉल अॅलर्ट आणि एसएमएस अलर्ट इत्यादींचा समावेश आहे.

डिझाइनहिरो स्प्लेंडर 125cc XTEC मध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी पोझिशन लॅम्प आणि आकर्षक ग्राफिक्स आहेत. बाईकच्या फ्रंटमध्ये एक ऑप्शनल डिक्स ब्रेक, रिअर ड्रम ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ट्विन शॉक ऍब्जॉर्बर्स, अलॉय व्हील्स ब्लॅक फिनिश, रायडर ट्रँगल यांचा समावेश आहे. तसेच, हिरो कंपनीची ही बाईक बाजारात होंडा कंपनीच्या सीबी शाइन 125 cc आणि टीव्हीएस रेडरसोबत स्पर्धा करते.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईक