शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Hero Passion XTEC: 'हिरो पॅशन'च्या नव्या मॉडलची पहिली झलक, LED हेडलॅम्प अन् स्मार्ट फिचर्स; जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 17:06 IST

देशातील सर्वात मोठी मोटारसायकल निर्माती कंपनी हिरो मोटोकॉपनं पॅशन मोटारसायकलच्या नव्या मॉडलची जाहीरात लॉन्च केली आहे.

देशातील सर्वात मोठी मोटारसायकल निर्माती कंपनी हिरो मोटोकॉपनं पॅशन मोटारसायकलच्या नव्या मॉडलची जाहीरात लॉन्च केली आहे. कंपनीनं Passion XTEC मॉडलसह पॅशन लाइनअपला आणखी मजबूत केलं आहे. या मोटारसायकलमध्ये अनेक स्मार्ट फिचर्स देण्यात आले आहेत. टीझरमध्ये LED हेडलाइट, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे जबरदस्त फिचर्स पाहायला मिळतात. हिरो कंपनीनं पॅशनचे XTEC चे दोन व्हेरिअंट बाजारात दाखल केले आहेत. यात ड्रम व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत ७४,५९० रुपये आहे. तर डिस्क व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत ७८,९९० रुपये इतकी आहे. 

LED हेृडलाइट यूनिटपॅशन XTEC ला सध्याच्या मॉडलच्या तुलनेत थोडं हटके आणि शानदार स्टाइलसह पेश करण्यात आलं आहे. हॅलोजन हेडलॅम्पच्या जागी LED हेडलाइटचा वापर करण्यात आला आहे. यात H शेपसह इंटिग्रेटेड LED DRLs देखील पाहायला मिळतात.  

नवी पॅशन नवे फिचर्सहिरोनं नव्या बाइकमध्ये SMS आणि कॉल अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे अत्याधुनिक फिचर्स दिले आहेत. पॅशनच्या नव्या मॉडलमध्ये USB चार्जिंग पोर्ट, क्रोम फिनिश्ड 3D ब्रान्डिंग आणि दमदारपणा उठून दिसावा यासाठी फ्लूअल टँकवर रिम टेप पाहायला मिळते. चालकाच्या सुरक्षेसाठी कंपनीनं एक साइड स्टँड व्हिजुअल इंडिकेटर आणि साइट स्टँड इंजिन कट ऑफ स्विच देखील दिला आहे. 

इंजिन आणि वॉरंटीHero Passion XTEC चं इंजिन लाइनअप पॅशन प्रोमधून घेण्यात आलं आहे. हे 113 CC, एअर कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिनसह उपलब्ध आहे. या बाइकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसंच उत्तम मायलेजसाठी i3S (आयडियल स्टार्ट स्टॉप सिस्टम) देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हिरो मोटोकॉपनं या मॉडलवर ५ वर्षांची स्टॅंडर्ड वॉरंटी देखील दिली आहे. 

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईक