शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Hero MotoCorp : स्वस्तात दुचाकी खरेदी करण्याची शेवटची संधी! जानेवारीमध्ये हिरो गाड्यांच्या किमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 15:05 IST

Hero MotoCorp : हिरो मोटोकॉर्प कंपनीने (Hero MotoCorp) जानेवारीपासून आपल्या दुचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : 2022 हे नवीन वर्ष येण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. येणारं नवीन वर्ष ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी चांगले ठरू शकेल, अशी वाहन निर्मात्या कंपन्यांना आशा आहे. दरम्यान, वाहन उद्योगासाठी 2021 वर्ष इतके खास नव्हते, कारण कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या विक्रीत घट पाहिली आहे. त्याचबरोबर, वाहन बनवताना लागणाऱ्या खर्चातही वाढ झाल्याने कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हिरो मोटोकॉर्प कंपनीने (Hero MotoCorp) जानेवारीपासून आपल्या दुचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

किती रुपयांची वाढ होईल?हिरो मोटोकॉर्प एका निवेदनात म्हटले आहे की, 4 जानेवारीपासून कंपनी आपल्या मोटरसायकल-स्कूटरच्या एक्स-शोरूम किमती 2000 रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. मॉर्केट आणि मॉडेलनुसार ही वाढ करण्यात येणार आहे.

सहा महिन्यांत तिसर्‍यांदा किमतीत वाढहिरो मोटोकॉर्प गेल्या सहा महिन्यांत तिसर्‍यांदा आपल्या दुचाकी वाहनांच्या किमती वाढवणार आहे. यापूर्वी, कंपनीने आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या एक्स-शोरूम किमती 1 जुलै रोजी 3,000 रुपयांनी वाढवल्या होत्या, तर अलीकडेच, कंपनीने 20 सप्टेंबर रोजी किमतीत 3,000 रुपयांनी वाढ केली होती. ही कंपनी तिसर्‍यांदा दुचाकी वाहनांवर किंमती वाढवणार आहे.

इतरही कंपन्यांही वाढवणार किंमतीगेल्या वर्षभरात स्टील, अॅल्युमिनियम, तांबे आणि मौल्यवान धातूंसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे वाहन उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कंपन्या आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करत आहेत.  हिरो मोटोकॉर्प व्यतिरिक्त, मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स, स्कोडा, फोक्सवॅगन यासारख्या इतर अनेक कंपन्यांनी येणाऱ्या नवीन वर्षात आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकAutomobileवाहन