शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Hero Electric उभारणार 20,000 चार्जिंग स्टेशन, अ‍ॅपवरून सर्च करता येणार लोकेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 16:24 IST

Hero Electric : हिरो इलेक्ट्रिकने देशभरात सुरूवातीला 10,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन (10,000 EV Charging Stations) उभारण्यासाठी दिल्लीस्थित स्टार्टअप कंपनी मॅसिव्ह मोबिलिटीसोबत (Massive Mobility) भागीदारी केली आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक असलेली हीरो इलेक्ट्रिक (Hero Electric) आता चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देत आहे. देशभरात 20,000 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हिरो इलेक्ट्रिकने देशभरात सुरूवातीला 10,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन (10,000 EV Charging Stations) उभारण्यासाठी दिल्लीस्थित स्टार्टअप कंपनी मॅसिव्ह मोबिलिटीसोबत (Massive Mobility) भागीदारी केली आहे. (hero electric to set up 20000 ev charging stations across india location can find through app)

2022 च्या अखेरपर्यंत 20,000 चार्जिंग स्टेशनईव्ही चार्जिंग स्टेशनच्या या संपूर्ण नेटवर्कचा वापर सर्व इलेक्ट्रिक वाहन कंपन्या करू शकतीत. यामुळे उत्पादकांमध्ये एक मानक स्थान निर्माण करण्यात मदत मिळेल. या संदर्भात हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले की, भारत सरकारने अलीकडेच अनेक घोषणा करून इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) मार्केटचा विस्तार केला आहे. हिरो इलेक्ट्रिक परवडणारी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी गुंतवणूक करत आहे.

याचबरोबर, 'आतापर्यंत कंपनीने 1650 चार्जिंग स्टेशन बसवले आहेत. 2022 च्या अखेरीस 20,000 चार्जिंग स्टेशन बसवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना कोणत्या प्रकारचे चार्जिंग स्टेशन हवे आहेत, यासाठी कंपनीने एक सर्वेक्षणही केले. यामध्ये असे आढळून आले की ग्राहकांना इंटरनेट किंवा अॅप स्थानासह 16 एएमपीएस पॉवर, लाँग चार्जिंग कॉर्ड आणि स्मार्ट चार्जिंग स्टेशन आवश्यक आहे, असे सोहिंदर गिल यांनी सांगितले.

अ‍ॅपवरून लोकेशन सर्च करता येणारमॅसिव्ह मोबिलिटी इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकींसाठी चार्जिंग स्टेशनचे क्लाउड-आधारित नेटवर्क तयार करण्याचे काम करत आहे. हे नेटवर्क पार्किंग आणि चार्जिंग पॉइंट्सच्या मालकांना जोडेल, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील. हीरो इलेक्ट्रिकने देशभरात 20,000 चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. 

हे नेटवर्क तयार करण्यासाठी मेसिव्ह मोबिलिटी एक मोबाईल अ‍ॅप मॅसिव्ह चार्जिंग विकसित करत आहे. या अ‍ॅपवर, युजर्स त्यांचे प्रोफाइल तयार करू शकतील आणि चार्जिंग स्टेशनवरील वाय-फाय सुविधा सुलभ पेमेंट, ओळख किंवा चार्जिंग पॉईंटचे लोकेशन इत्यादींची माहिती मिळवण्यास मदत होईल.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनbusinessव्यवसाय