शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आता कोणत्याही त्रासाशिवाय खरेदी करा Hero Electric टू-व्हीलर; कंपनीकडून कर्जाची सुविधा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 12:55 IST

Hero Electric : देशभरातील हिरो इलेक्ट्रिकच्या 750 डीलरशिप्सकडून ग्राहक टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात. 

नवी दिल्ली : हिरो इलेक्ट्रिकने (Hero Electric) आपल्या सर्व वाहनांसाठी सुलभ आणि त्रासमुक्त फायनान्स करण्यासाठी अॅक्सिस बँकेसोबत ( Axis Bank) करार केला आहे, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये. देशभरातील हिरो इलेक्ट्रिकच्या 750 डीलरशिप्सकडून ग्राहक टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात. 

हिरो इलेक्ट्रिक आणि अॅक्सिस बँकेच्या भागीदारीमुळे ग्राहकांना आणखी बरेच फायदे मिळणार आहेत, येथे ग्राहक कमी कागदपत्रे सबमिट करून कोणत्याही त्रासाशिवाय आणि सहज टू-व्हीलर खरेदी करू शकतात.

हीरो इलेक्ट्रिकचे म्हणणे आहे की, या करारामुळे ग्राहकांना खूप चांगली खरेदी करण्याची संधी मिळेल. एक आर्थिक भागीदार म्हणून अॅक्सिस बँक स्वतंत्र ग्राहकांना कर्जाची रक्कम कस्टमाइज करण्यासाठी आणि सोबत डीलससाठी कमी किंवा जास्त होणाऱ्या कर्जाची कालावधी प्रदान करेल.

गेल्या काही महिन्यांत ईव्हीच्या मागणीत वाढ हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले, "गेल्या काही महिन्यांत आम्ही ईव्हीच्या मागणीत वाढ पाहिली आहे. हिरो आपल्या अनेक प्रयत्नांसह रहदारीचे वातावरण बदलण्यासाठी आणि ग्राहकांचा इलेक्ट्रिक  टू-व्हीलर ओनरशिपचा अनुभव वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.  टू-व्हीलर खरेदी करणे आणखी सोपे करण्यासाठी, आम्ही आमच्या परिने बदलण्यायोग्य फंडिंग पर्यायांचा विस्तार करत आहोत. वाढत्या मागणीसह, भारतातील लहान शहरे आणि ग्रामीण भागात इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून तेथील रस्त्यांचेही इलेक्ट्रिफाय करता येईल."

भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालनाअॅक्सिस बँकेतील रिटेल लेंडिंग अँड पेमेंट्सचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि हेड सुमित बाली म्हणाले, "आम्ही हिरोसोबत भागीदारी करताना अत्यंत आनंदी आहोत आणि आमच्या डीलर्सना तसेच ग्राहकांना सर्वोत्तम आर्थिक पर्याय प्रदान करू. देशभरातील आमचे मजबूत रिटेल बँकिंग नेटवर्क ग्राहकांना त्रासमुक्त खरेदी अनुभव प्रदान करेल. हा करार भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करतो."

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन