ओला (Ola) आणि ओकिनावा (Okinawa) सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर्सना आग लागण्याच्या घटनांनंतर आता एथर एनर्जीच्या डीलरशिपवरही (Ather Energy) आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, ही आग छोटी असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. तर दुसरीकडे २५ मे रोजी ओडिशामध्ये Hero Photon EV या स्कूटरलाही आग लागल्याची घटना घडली आहे.
तुम्ही दुसऱ्यांचं ऐकण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला सांगतो ती चेन्नईच्या शोरुमध्ये आगीची एक छोटी घटना घडली आहे. आमच्या काही मालमत्तेचं आणि स्कूटरचं नुकसान झालंय. सुदैवानं आमचे कर्मचारी सुरक्षित आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. हे सेंटर त्वरितच पुन्हा खुलं केलं जाईल, असं ट्वीट एथर एनर्जीनं केलं.
दरम्यान, ही आग कशी लागली याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही किंवा कंपनीचे को-फाऊंडर तरूण मेहता यांनी याबाबत काही अपडेटही दिलं नाही. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार त्वरित सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. परंतु यात काही स्कूटर्स जळून खाक झाल्या.