शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

ताशी १०० किमी वेगाने ट्रॅक्टरवर आदळली दणकट MG Hector, ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 14:04 IST

MG Hector & Tractor Accident: एमजी हेक्टर ताशी १०० किमी वेगाने एका ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. या अपघातानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो.

नवी दिल्ली - एमजी मोटर्स या वाहन निर्माता कंपनीसाठी भारतीय बाजारातील एमजी हेक्टर हे महत्त्वपूर्ण प्रॉ़डक्ट आहे. याची तुलना महिंद्राच्या एक्सयूव्ही ७०० सोबत केली जाते. ती ५ स्टार सेफ्टीसह येते. एमजी हेक्टरची अद्याप तरी क्रॅश टेस्ट झालेली नाही. मात्र अनेकांकडून तिच्या सेफ्टीबाबत या कारचं कौतुक होत असतं. दरम्यान, हल्लीच या कारच्याअपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्यून MG Hectorची बिल्ड क्वालिटी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही एमजी हेक्टर ताशी १०० किमी वेगाने एका ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. या अपघातानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो.

या अपघाताचे फोटो, व्हिडीओ एका युट्युबरने अपलोड केले आहेत. एमजी हेक्टर आणि ट्रॅक्टरचा हा अपघात बिहारमध्ये झाला. व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार एमजी हेक्टर ज्यावेळी ट्रॅक्टरवर आदळली, तेव्हा तिचा वेग हा सुमारे १०० किमी प्रति तास एवढा होता. हा अपघात झाला तेव्हा ट्रॅक्टर चालक चुकीच्या लेनमधून चालत होता. ट्रॅक्टर चालक अचानक चुकीच्या लेनमध्ये आल्याने दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर झाली. 

अपघातामध्ये एमजी हेक्टरच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर ट्रॅक्टरच्या समोरील  भागाचे दोन तुकडे झाले. दरम्यान, या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाल आहे. सुदैवाने या अपघातात एमजी हेक्टरचा चालक वाचला. गाडीच्या आतील भागाचे फार नुकसान झाले नाही. तसेच अपघातावेळी तिच्यातील एअरबॅग्सही उघडल्या गेल्या. हे चित्र एमजी हेक्टरच्या दणकट बिल्ड क्वालिटीला दर्शवणारे ठरले.  

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्सcarकारAccidentअपघात