शहरं
Join us  
Trending Stories
1
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
2
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
3
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
4
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
5
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
6
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
7
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
8
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
9
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
10
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
11
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
12
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
13
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
14
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
16
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
17
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
18
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
19
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
20
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:32 IST

नवीन Honda City चे डिझाईन होंडाच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या '0 Series sedan concept' मधून प्रेरित असणार आहे.

भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रतिष्ठित सेडान कारपैकी एक असलेल्या Honda City चे पुढील (सहावे) पिढीचे मॉडेल २०२८ मध्ये मोठे डिझाईन आणि तांत्रिक बदल घेऊन येणार आहे. Hyundai Verna, Skoda Slavia आणि Volkswagen Virtus यांसारख्या कठीण प्रतिस्पर्धकांमध्ये आपले नेतृत्व परत मिळवण्यासाठी कंपनीने हे मोठे पाऊल उचलले आहे.

नवीन Honda City चे डिझाईन होंडाच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या '0 Series sedan concept' मधून प्रेरित असणार आहे. हे डिझाईन अधिक बोल्ड, स्लीक आणि स्पोर्टी असेल. यातील सर्वात मोठे आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळात लोकप्रिय असलेल्या 'फ्रंट क्वार्टर ग्लास' चे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा डिझाईन घटक प्रतिष्ठित सुपरकार Lamborghini Countach मधून प्रेरित आहे, ज्यामुळे सेडानच्या बाहेरील स्वरूपात लक्षणीय बदल दिसेल आणि ती पूर्वीपेक्षा अधिक ऍथलेटिक दिसेल.

हायब्रीड खर्च कमी करण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्मसध्याच्या City e: HEV (हायब्रीड) मॉडेलला उत्कृष्ट मायलेज असूनही, तिची जास्त किंमत ही या कारची कमकुवत बाजु आहे. नवीन सिटी 'PF2 मॉड्युलर आर्किटेक्चर' वर आधारित असेल. हा नवीन प्लॅटफॉर्म विशेषतः हायब्रीडाइजेशनसाठी तयार केला गेला आहे. हा प्लॅटफॉर्म सध्याच्या हायब्रीड बेसपेक्षा सुमारे ९० किलो हलका आहे. पार्ट्सचे लोकल-उत्पादन होऊन बॅटरी पॅकचा खर्चही प्रभावीपणे कमी करता येणार आहे. इंजिन पर्यायांमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच १.५-लिटर पेट्रोल आणि १.५-लिटर एटकिंसन-सायकल हायब्रीड (१२६ hp) इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Next-Gen Honda City: Leaked Design, Launch, and Platform Details

Web Summary : The 2028 Honda City will feature a bold redesign inspired by Honda's '0 Series sedan concept', potentially including a 'front quarter glass' reminiscent of the Lamborghini Countach. Built on a new 'PF2' platform for hybridisation, it aims to reduce costs and weight while retaining the 1.5-liter petrol and hybrid engine options.
टॅग्स :Hondaहोंडा