दीड लाखांत 'क्यूट' कार; मायलेज मस्त, स्पीडही जबरदस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:54 PM2018-07-19T12:54:16+5:302018-07-19T12:55:16+5:30

टाटांच्या नॅनोला टक्कर देणारी बजाज कंपनीची Bajaj Qute कार लवकरच बाजारात दाखल होत आहे. भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या कारला परवानगी दिली.

'Half a million' cute 'cars; Mileage cool, speedy tremendous! | दीड लाखांत 'क्यूट' कार; मायलेज मस्त, स्पीडही जबरदस्त!

दीड लाखांत 'क्यूट' कार; मायलेज मस्त, स्पीडही जबरदस्त!

googlenewsNext

नवी दिल्ली - टाटांच्या नॅनोला टक्कर देणारी बजाज कंपनीची Bajaj Qute कार लवकरच बाजारात दाखल होत आहे. भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या कारला परवानगी दिली. त्यानुसार बजाज Qute चा चारचाकी कॅटेगिरीत समावेश करण्यात आला आहे. या कारची निर्मित्ती भारतात होत असून कारची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री होणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना केवळ 1.5 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत ही कार मिळणार आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच मार्च 2019 पर्यंत ही कार रस्त्यावर धावेल, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. 'मारुती अल्टो 800 आणि रेडी-गो' यांसारख्या चारचाकी गाड्यांना या कारचे आव्हान असणार आहे. कारण, Bajaj Qute कारची किंमत 1.50 लाख रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात येत आहे.

कारची वैशिष्टे : -

* Bajaj Qute कारमध्ये 216.6 cc चे सिंगल सिलिंडर फ्यूल इंजेक्टेड इंजन आहे. ज्यामुळे 13bhp पॉवर आणि 20Nm टॉर्क असेल. 
* कारमध्ये 5 स्पीड सीक्वेंशल गियरबॉक्स असणार असून टॉप स्पीड 70kmph राहिल. या कारमधून चारजण आरामात प्रवास करु शकतील.
* या कारचे वजन केवळ 400 किलोग्रॅम असून उंची 2.75 मीटर तर रुंदी 1.3 मीटर एवढी आहे.
* ही कार प्रतिलिटर 35 किमीचा धावेल. 
दरम्यान, या कारची ऑटोमोबाईल बाजारात लाँचिंगपूर्वीच जारोदार चर्चा सुरू आहे. तर ग्राहकांनाही कारबाबत अधिक उत्सुकता लागली आहे.

Web Title: 'Half a million' cute 'cars; Mileage cool, speedy tremendous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.