शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

चार नव्या Electric Scooters एकत्र झाल्या लाँच; किंमत ६० हजारांपासून, पाहा फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 20:11 IST

Electric Vehicles : ग्रेटा इलेक्ट्रीकनं भारतीय बाजारपेठेत लाँच केल्या चार इलेक्ट्रीक स्कूटर्स

गुजरातमधील इलेक्ट्रिक वाहन कंपनी ग्रेटा इलेक्ट्रीकने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या चार इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. कंपनीच्या या स्कूटर्समध्ये Harper, Evespa, Glide आणि Harper ZX यांचा समावेश आहे. भारतात या इलेक्ट्रीक स्कूटर्सची किंमत ६० हजार ते ९२ हजार रुपयांदरम्यान आहे. या ई-स्कूटर्समध्ये आकर्षक एक्सटीरिअर कलर, डिझायनर कन्सोल आणि मोठी स्टोरेज स्पेस मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या स्कूटर्स ७० ते १०० किमीची रेंज देतात.

या सर्व इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये डेटाईम रनिंग लाईट, ईबीएस, रिव्हर्स मोड, ATA सिस्टम, स्मार्ट शिफ्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट आणि अँटी थेफ्ट अलार्म असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. रिंगल चार्जवर या स्कूटर्स १०० किमीपर्यंतच्या रेंजसह आरामदायक रायडिंगचा अनुभव देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये 48V/60V लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ई-स्कूटरसाठी बॅटरी पॅक निवडण्याचा पर्यायही देत ​​आहे. ग्रेटा इलेक्ट्रीक स्कूटरचा दावा आहे की इ-स्कूटर १०० टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे चार तासांचा कालावधी लागतो.

काय आहेत फीचर्स?ग्रेटा हार्पर, इव्हेस्पा आणि हार्पर ZX मॉडेल्सना ड्रम डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत, तर ग्लाइडमध्ये ड्युअल डिस्क हायड्रॉलिक ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. या इ-स्कूटर 22 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सर्व स्कूटरमध्ये वेगवेगळी बॉडी स्टाइल आणि युनिक कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, हार्पर आणि हार्पर ZX मध्ये फ्रंट ऍप्रन, शार्प बॉडी पॅनेल्स आणि स्लीक टर्न सिग्नल्ससह स्पोर्टी प्रोफाइल मिळते. दोघांमधील सर्वात मोठा फरक हा आहे की हार्परला ड्युअल हेडलॅम्प युनिट देण्यात आले आहे, तर हार्पर ZX ला सिंगल हेडलॅम्प मिळतो.

Evespa ही एक रेट्रो-स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर आहे, ती पेट्रोल इंजिन असलेल्या Vespa स्कूटरसारखी दिसते. ही स्कूटर क्लासिक फ्लॅट फ्रंट ऍप्रन, कर्व्ही बॉडी पॅनल्स, गोल हेडलॅम्प आणि राउंड रियर व्ह्यू मिररसह येतो. पुढच्या ऍप्रनवर टर्न सिग्नलही देण्यात आलेले आहेत.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड