शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 80 रुपयांत 800KMS धावणार 'ही' स्वस्त Electric Bike; पाहा हायटेक फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:04 IST

Electric Vehicles : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण आता अन्य पर्यायांकडे वळू लागले आहेत.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण आता अन्य पर्यायांकडे वळू लागले आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये देशात इलेक्ट्रीक वाहनांची (Electric Vehicles) विक्री वाढू लागली आहे. अनेक कंपन्या सध्या इलेक्ट्रीक गाड्या लाँच करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या बाजारातही हळूहळू अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागलेत. आज आपण ग्रेवटन मोटर्सच्या Gravton Quanta इलेक्ट्रीक टू व्हिलर्सबाबत माहिती देणार आहोत. केवळ 80 रुपयांत ही बाईक 800 किमीपर्यंत चालेल असा दावा कंपनीनं केला आहे.

कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार Gravton Quanta इलेक्ट्रीक बाईक 100 किलोमीटर चालवण्यासाठी 10 रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये कंपनीनं 3kWh Li-ion बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये बाईक १५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. यामध्ये एकत्र दोन बॅटरी ठेवण्यासाठीही एक विशेष सुविधा देण्यात आली आहे. याचाच अर्थ एका चार्जिंगमध्ये तुम्ही 320 किमीपर्यंत जाऊ शकता. 

70 kmph आहे टॉप स्पीड ही बाईक एकून तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. ब्लॅक कलरची स्पेशल एडिशन म्हणून विक्री केली जाईल. याच्या लिमिटेड युनिट्सचीच विक्री करण्यात येईल. ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन या बाईकचं बुकिंग करता येईल. या बाईकमध्ये 3KW ची BLDC मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 170Nm चा टॉर्क जनरेट करते. या बाईकचा सर्वाधिक वेग 70Kmph आहे. 

फास्ट चार्जिंगच्या माध्यमातून या बाईकची बॅटरी ही 90 मिनिटांमध्ये फुल चार्ज होते. सामान्य मोडमध्ये चार्ज होण्यासाठी या बाईकला तीन तासांचा कालावधी लागतो. Gravton Quanta बॅटरीवर पाच वर्षांची वॉरंटी आणि रिप्लेसमेंट अश्योरन्ससह उपलब्ध आहे. या बाईकमध्ये कंपनीनं 17 इंचाचे व्हिल्स, डिस्क ब्रेक, डिजिटल डॅशबोर्ड, ऑल LED सारखे फिचर्सही दिली आहेत. तसंच Quanta Smart अॅपद्वारे ही बाईक कनेक्ट केली जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना रोडसाईड असिस्टंस, मॅपिंग सर्व्हिस स्टेशन, रिमोट लॉक/अनलॉक, लाईट बंद सुरू करण्यासारख्याही सुविधा मिळतात.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनbikeबाईक