शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नव्या एर्टिगाचं ग्राहकांना गिफ्ट, जाणून घ्या एक्सेसरिजची पूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 9:26 PM

मारुती सुझुकीची बहुप्रतीक्षित कार एर्टिगा एमपीव्ही 21 नोव्हेंबरला भारतीय बाजारात दाखल झाली आहे.

मुंबई- मारुती सुझुकीची बहुप्रतीक्षित कार एर्टिगा एमपीव्ही 21 नोव्हेंबरला भारतीय बाजारात दाखल झाली आहे. या कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या अत्याधुनिक एर्टिगामध्ये नवनवे फीचर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे मारुतीच्या या नव्या एर्टिगामध्ये बऱ्याच एक्ससरीज देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये अँबिशिअर आणि इंडल्ग असे दोन प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ग्राहकांना स्वतःच्या आवडीनुसार या नव्या एर्टिगामध्ये एक्ससरीज दिल्या आहेत.या अत्याधुनिक एर्टिगाच्या फीचर्समध्ये बॉक्स फिनिश लायनिंग सीट कव्हर्स, क्रोम इंसर्टसह बॉडी साइड मोल्डिंग, रिअर अप्पर स्पॉयलर, IRVMमध्ये रिव्हर्स पार्किंग असिस्ट, बंपर कॉर्नर प्रोटेक्टर्स, डिझायनर मेट्स, विंडो फ्रेम किट, स्टिअरिंग व्हील कव्हर आणि टिश्यू बॉक्सचा समावेश आहे. अक्सेसरीजमध्ये नॉटिकल स्टार फिनिश सीट कव्हर, गार्निश फिनिशबरोबर बॉडी साइड मोल्डिंग, रिअर बंपर गार्निश, विंडो फ्रेम किट, डिलक्स कार्पेट मॅट आणि मेपल वुड फिनिशिंगबरोबरच इंटिरिअर स्टायलिंग किंटचा समावेश आहे.

या एर्टिगामध्ये 15 इंच अलॉय व्हील्स, व्हील कव्हर्स, एक्सटिरिअर स्टायलिंग किट, डोर सिल गार्ड, एल्युमिनेशनबरोबर डोर सिल गार्ड, फॉग लॅम्प गार्निश आणि 4 सेंसर्सबरोबरच रिव्हर्स पार्किंग अॅड, IRVM डिस्प्ले आणि कॅमेराही घेऊ शकता.
एर्टिगामध्ये सेन्सरसह सिक्युरिटी सिस्टीम, नॉर्मल प्रीमियम बॉडी कव्हर्स, प्रीमियम आर्ट लेदर सीट कव्हर्स, डॅशबोर्डसाठी इंटीरियर स्टायलिंग किट, नंबर प्लेट गार्निश, 1000 वाटचा सब वूफर, कार परफ्युम आणि स्पीड गव्हर्नर अक्सेसरीज घेऊ शकता. मारुती एर्टिगानं 10 व्हेरिएंटच्या गाड्या लाँच केल्या आहेत.
यात पेट्रोल इंजिन, मॅन्युअल ट्रान्समिशनचे चार व्हेरिएंट(LXi, VXi, ZXi आणि ZXi+) यांचा समावेश आहे. पेट्रोल इंजिन, एएमटीचे दोन व्हेरिएंट (VXi आणि ZXi) आणि डिझेल इंजिनचे चार व्हेरिएंट (LDi, VDi, ZDi व ZDi+)चाही समावेश आहे. मारुतीच्या नव्या एर्टिगाची किंमत 7.44 लाखांपासून सुरू होते. तसेच यातील टॉप व्हेरिएंट 10.90 लाख रुपयांना मिळतो.
नव्या एर्टिगामध्ये 1.5 लीटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 6000rpmवर 105hpची पॉवर तर 4,400rpmवर 138Nm टॉर्क जनरेट करावं लागणार आहे. डिझेल व्हेरिएंट 1.3 लीटरचं इंजिन आहे, जे 4400rpmवर 90hpची पॉवर आणि 1,750rpmवर 200Nm टॉर्क जनरेट करतो.
दोन्ही इंजिनमध्ये SHVS माइल्ड- हायब्रिड सिस्टीम आहे. ज्यात ड्युल बॅटरी मेकेनिजम देण्यात आलं आहे.  

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी