मुंबई- मारुती सुझुकीची बहुप्रतीक्षित कार एर्टिगा एमपीव्ही 21 नोव्हेंबरला भारतीय बाजारात दाखल झाली आहे. या कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या अत्याधुनिक एर्टिगामध्ये नवनवे फीचर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे मारुतीच्या या नव्या एर्टिगामध्ये बऱ्याच एक्ससरीज देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये अँबिशिअर आणि इंडल्ग असे दोन प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ग्राहकांना स्वतःच्या आवडीनुसार या नव्या एर्टिगामध्ये एक्ससरीज दिल्या आहेत.या अत्याधुनिक एर्टिगाच्या फीचर्समध्ये बॉक्स फिनिश लायनिंग सीट कव्हर्स, क्रोम इंसर्टसह बॉडी साइड मोल्डिंग, रिअर अप्पर स्पॉयलर, IRVMमध्ये रिव्हर्स पार्किंग असिस्ट, बंपर कॉर्नर प्रोटेक्टर्स, डिझायनर मेट्स, विंडो फ्रेम किट, स्टिअरिंग व्हील कव्हर आणि टिश्यू बॉक्सचा समावेश आहे. अक्सेसरीजमध्ये नॉटिकल स्टार फिनिश सीट कव्हर, गार्निश फिनिशबरोबर बॉडी साइड मोल्डिंग, रिअर बंपर गार्निश, विंडो फ्रेम किट, डिलक्स कार्पेट मॅट आणि मेपल वुड फिनिशिंगबरोबरच इंटिरिअर स्टायलिंग किंटचा समावेश आहे.
नव्या एर्टिगाचं ग्राहकांना गिफ्ट, जाणून घ्या एक्सेसरिजची पूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 21:28 IST