धुम मचा ले..... स्टायलिश आणि स्पोर्टी लूकसह येतेय बजाज NS125
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 19:21 IST2022-09-01T19:21:41+5:302022-09-01T19:21:58+5:30
रायडिंगच्या दृष्टीनंही पल्सर NS125 ही उत्तम असून 125cc श्रेणीतील सर्व बाईक्सना मागे टाकण्याची ताकदही या बाईकमध्ये आहे.

धुम मचा ले..... स्टायलिश आणि स्पोर्टी लूकसह येतेय बजाज NS125
Pulsar NS125 ही बाईक बजाजच्या NS सीरिजच्या ताफ्यात सामील होणारी नवी बाईक आहे. स्पोर्टी आणि स्टायलिश लूकसह येणारी ही बाईक बाजारात आपली छाप सोडण्यास तयार असून बजाजनं यापूर्वी NS160 आणि NS200 देखील लाँच केल्या आहेत. बजाज Pulsar NS125 चं डिझाईन सर्वांच्याच डोळ्यांना सुखद अनुभव देतं आणि कदाचित त्यामुळेच ते अद्यापही ट्रेंडमध्ये आहे. सिंगल हेडलाईट आणि ट्विन पायलट लँप असा युथफुल फेस सर्वांनाच नक्की आवडेल. तरूण वर्गाला ध्यानात घेऊन ही एन्ट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक तयार करण्यात आली आहे.
बजाज पल्सर NS125 मध्ये 124.45cc BS6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 11.6 bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क जनरेट करते. नव्या पल्सरमध्ये फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक देण्यात आले असून ही बाईक कम्बाईन्ड ब्रेकिंग सिस्टमसह येते. पल्सर NS125 बाईकचे वजन 144 किलोग्रॅम असून यामध्ये 12 लिटरचा फ्युअल टँक देण्यात आला आहे. कदाचित भारतात खरेदी करता येणारी बजाज NS125 सर्वात मॉडर्न बाईकही आहे. ही बाईक प्रसिद्ध Pulsar NS200 च्या प्लॅटफॉर्मवरच तयार करण्यात आली आहे.
शहरातील गर्दीमध्येही चालवण्यासाठी ही उत्तम बाईक आहे. याशिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीही ही बाईक पर्वणी ठरू शकते. रायडिंगच्या दृष्टीनंही पल्सर NS125 ही उत्तम असून 125cc श्रेणीतील सर्व बाईक्सना मागे टाकण्याची ताकदही या बाईकमध्ये आहे. 125cc श्रेणीतील सर्व बाईक्सना टक्कर देण्याची क्षमता या बाईकमध्ये आहे. बाईकमध्ये फ्रन्टला सिंगल 240 mm डिस्क ब्रेक देण्यात आले असून मागील बाजूला 130mm ड्रम युनिट देण्यात आलं आहे. उत्तम परफॉर्मन्ससह बजाज पल्सर NS125 ही आपल्या सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट बाईक ठरते आणि 125cc श्रेणीतील बाईक्सच्या तुलनेत कमी किंमतीतही येते. परफॉर्मन्स आणि लूकच्या बाबतीत ही बाईक आपल्या स्पर्धकांना मोठी टक्करही देते. ही बाईक कामगिरी आणि लूकच्या बाबतीत नक्कीच आपल्या स्पर्धकांपेक्षा वरचढ आहे आणि तुम्हाला सुमारे एक लाखांत मिळू शकणारा सर्वोत्कृष्ट स्पोर्टी पर्यायही आहे!