शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारतात इंधन क्रांती; ६ लाख लाेकांना नाेकऱ्या, ‘हरित हायड्रोजन मिशन’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 11:47 IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन’ला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेसाठी १९,७४४ कोटी ...

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन’ला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेसाठी १९,७४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यातून वर्षाला ५० लाख टन हरित हायड्रोजनची निर्मिती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नंतर निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. 

ठाकूर यांनी सांगितले की,  या योजनेद्वारे भारताला हरित हायड्रोजनचे जागतिक भांडार बनविण्याचे उद्दिष्ट आहे. २०३० पर्यंत वर्षाला ५० लाख टन हरित हायड्रोजनचे उत्पादन यात करण्यात येईल. खरेदीदार व विक्रेते यांना एका छताखाली आणण्यासाठी हरित हायड्रोजन केंद्र विकसित केले जाईल. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी नूतन व नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयावर असेल

भविष्यातील इंधन, भारताला व्हायचेय आत्मनिर्भरग्रीन हायड्राेजन आणि ग्रीन अमाेनिया याकडे भविष्यातील प्रमुख इंधन म्हणून पाहिले जात आहे. भारत याबाबतीत आत्मनिर्भर हाेऊ इच्छिताे. सध्या पेट्राेलियम इंधनासाठी देशाला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी ग्रीन हायड्राेजनवर धावणाऱ्या कारचा उल्लेख केला आहे. 

६ लाख नोकऱ्या होणार निर्माण-हरित हायड्रोजन मिशनसाठी एकूण १९,७४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मिशनद्वारे ८ लाख कोटी रुपयांची थेट गुंतवणूक होईल. -६ लाख नोकऱ्या उपलब्ध होतील. ५० दशलक्ष टन हरित वायू उत्सर्जन कमी केले जाईल.-मिशनअंतर्गत ६० ते १०० गिगावॅट इलेक्ट्रोलायझर क्षमता तयार करणार.- १७,४९० कोटी रुपये मिळणार इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी.

- ४०० कोटी रुपयांची तरतूद हरित हायड्रोजन हब विकसित करण्यासाठी. - ५ वर्षांसाठी प्रोत्साहन देणार इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी.

काय आहे ग्रीन हायड्राेजन ?हा ऊर्जेचा एक स्वच्छ स्राेत आहे. यामुळे प्रदूषण हाेत नाही. पाण्यातून हायड्राेजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जाते. त्यासाठी इलेक्ट्राेलायझरचा वापर हाेताे.हे उपकरण नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर करताे.

टॅग्स :Automobileवाहन