चार नवे रंग, Bajaj Pulsar 150 नवा अपडेटेड अवतार; यामाहा FZS FI ला टक्कर देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:17 PM2021-03-22T12:17:20+5:302021-03-22T12:18:28+5:30

Bajaj Pulsar 150 new update: अपडेटेड पल्सर 150 डीलरशीपकडे पोहोचविण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ही बाईक लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच या बाईकच्या किंमतीचाही खुलासा होईल.

Four new colors, Bajaj Pulsar 150 new update will launch soon in India | चार नवे रंग, Bajaj Pulsar 150 नवा अपडेटेड अवतार; यामाहा FZS FI ला टक्कर देण्याच्या तयारीत

चार नवे रंग, Bajaj Pulsar 150 नवा अपडेटेड अवतार; यामाहा FZS FI ला टक्कर देण्याच्या तयारीत

googlenewsNext

देशाची मोठी टू व्हीलर कंपनी बजाज ऑटो पल्सर 150 (Bajaj Pulsar 150) आणखी चांगली बनविण्याच्या तयारीला लागली आहे. कंपनी ही नवीन पल्सर फेसलिफ्ट चार नवीन रंगात आणणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सध्या या नव्या पल्सरचे काही फोटो सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनेलवर व्हायरल होत आहेत. (Bajaj Auto will launch Bajaj Pulsar 150 BS6 soon in four colors.) 


अपडेटेड पल्सर 150 डीलरशीपकडे पोहोचविण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ही बाईक लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच या बाईकच्या किंमतीचाही खुलासा होईल. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. नवीन पेंट स्कीमनुसार या नव्या पल्सर 150मध्ये ड्युअल-टोन इफेक्ट पहायला मिळणार आहे. व्हाईट आणि ब्लॅक रंगात फ्युअल टँक, बेली पेन, रिअर काऊल आणि हेडलाईट काऊलवर रेड आणि ब्लॅक ग्राफिक्स मिळेल. या पद्धतीने ब्ल्यू आणि रेड कलर ऑप्शनमध्ये व्हाईट आणि ब्लॅक ग्राफिक्स मिळणार आहेत. 


पल्सरमध्ये 149.5 cc चे DTS-i इंजिन दिले जाणार आहे. हे इंजिन फ्युअल इंजेक्शन (Fi) तंत्रज्ञानाद्वारे बनविलेले असणार आहे. यामुळे मायलेजमध्ये वाढ होणार आहे. हे इंजिन 14 PS ची ताकद आणि 13.4 Nm चा टॉर्क देते. में 5-स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. इंजिनमध्ये काही बदल केलेला नसला तरीही लुकमध्ये खूप मोठे बदल करण्यात आले आहेत. 


Yamaha FZS FI शी मुकाबला
बजाजच्या नव्या पल्सर 150 चा मुकाबला यामाहाच्या FZS FI सोबत होणार आहे. यामाहा FZS FI मध्ये देखील 149 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12.40 पीएसची ताकद आणि 13.6 एनएम टॉर्क प्रदान करते. यामाहाच्या या नव्या व्हिंटेज एडिशनमध्ये कनेक्ट एक्स एप्लिकेशनसोबत ब्लूटूथ कनेक्टिविटी फीचर देण्यात आले आहे. या बाईकची किंमत 1.09 लाख रुपये एक्स शोरुम आहे. 

स्वदेशी दुचाकी वाहन निर्माता कंपनी Bajaj Auto (बजाज ऑटो)ने आज भारतीय बाजारात Pulsar 180 (पल्सर 180) लाँच केली आहे. या बाईकमध्ये बीएस-6 चे इंजिन देण्यात आले आहे. सध्या ही बाईक एकाच रंगात उपलब्ध करण्यात आली आहे. नव्य़ा पल्सरमध्ये काही बाहेरून बदल करण्य़ात आले आहेत. मात्र, मॅकेनिकल काहीच बदललेले नाही. नव्या 2021 Bajaj Pulsar 180 सेमी फेयर्ड Pulsar 180F वाले इंजिन देण्यात आले आहे. नव्या बाईकमध्ये बीएस-6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 178.6 cc सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 16.7 PS आणि 6,500 rpm वर 14.52 Nm चे टॉर्क देते. 5-स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकचे वजन 145 किलो आहे. जी सेमी फेयर्स मॉडेलच्या तुलनेत 10 किलोने हलकी आहे. 

Web Title: Four new colors, Bajaj Pulsar 150 new update will launch soon in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.