Bajaj Qute: Nano, Alto विसरून जाल, बजाजने आणली दुचाकीपेक्षा स्वस्त कार, अशी आहेत वैशिष्ट्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 03:15 PM2023-01-24T15:15:03+5:302023-01-24T15:15:54+5:30

Bajaj Qute: . प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाजने काही दिवसांपूर्वीच आपली Bajaj Qute लॉन्च केली आहे. आतापर्यंत ही कार केवळ व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होती. मात्र लवकरच ती खासगी ग्राहकांनाही उपलब्ध होणार आहे.

Forget about Nano, Alto, Bajaj has brought a car cheaper than a two-wheeler, these are the features | Bajaj Qute: Nano, Alto विसरून जाल, बजाजने आणली दुचाकीपेक्षा स्वस्त कार, अशी आहेत वैशिष्ट्ये 

Bajaj Qute: Nano, Alto विसरून जाल, बजाजने आणली दुचाकीपेक्षा स्वस्त कार, अशी आहेत वैशिष्ट्ये 

googlenewsNext

आपल्या देशात स्वस्त कारची मागणी नेहमीच राहिलेली आहे. त्यातूनच प्रेरित होत रतन टाटा यांनी आपली महत्त्वाकांक्षी Tata Nano कार लाँच केली होती. त्या कारच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात आहेत. तर मारुतीची ऑल्टो कारसुद्धा ग्राहकांच्या मनात भरलेली आहे. आता किफायतशीर कारच्या पर्यायांमध्ये आणखी एक पर्याय जोडला गेला आहे. प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाजने काही दिवसांपूर्वीच आपली Bajaj Qute लॉन्च केली आहे. आतापर्यंत ही कार केवळ व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होती. मात्र लवकरच ती खासगी ग्राहकांनाही उपलब्ध होणार आहे. म्हणजेच तुम्ही अन्य कुठल्या दुचाकी किंवा कारच्या ऐवजी बजाज क्युटला खरेदी करू शकाल.

बजाजची क्यूट क्वाड्रिसायकल श्रेणीमध्ये येते. या सेगमेंटला थ्री व्हिलर आणि फोर व्हिलरच्या मध्ये ठेवण्यात आले आहे. या खास सेगमेंटमुळेच ही कार लाँच करण्यामध्ये बराच काळ गेला. २०१८ मध्ये ही क्यूट कार लाँच करण्यात आली. कंपनीने ही कार ऑटो रिक्षाला पर्याय म्हणून आणली होती. तसेच तिची किंमत २.४८ लाख एवढी ठेवण्यात आली होती. यामध्ये ऑटोरिक्षा प्रमाणेच तीन जणांना बसण्याची व्यवस्था आहे. तसेच यामध्ये रुप देण्यात आली आहे. तिच्यात कम्फर्टेबल स्लायडिंग मिळते. तसेच दर्जेदार प्रोटेक्शनही देण्यात आले आहे. या कारचा टॉप स्पिड सध्यातरी ताशी ७० किमी राहण्याची शक्यता आहे. मात्र तिची पॉवर १०.८एपीवरून वाढवून १२.८ करण्यात आली आहे.

नव्या अवतारामध्ये या कारचं वजनही १७ किलोने वाढले आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही रूपात येते. पेट्रोल इंजिनमध्ये या कारचं वजन ४५१ किलो एवढं आहे. तर सीएनजीमध्ये याचं वजन ५०० किलो एवढं होतं. अतिरिक्त १७ किलो वजन वाढण्यामागे स्टँडर्ड विंडो आणि एसी हे कारण असू शकतात.

या कारमध्ये ड्रायव्हरसह चार जणांच्या बसण्याची व्यवस्था आहे. Bajaj Qute 4W आणि 216 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. ते १०,८ हॉर्सपॉवर आणि १६.१ एनएम टॉर्क निर्माण करते. आता या कारची पॉवर २ बीएचपीने वाढवली असली तरी टॉर्क आधीप्रमाणेच राहील.  

Web Title: Forget about Nano, Alto, Bajaj has brought a car cheaper than a two-wheeler, these are the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.