शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

फोर्ड इंडियाकडून BS6 इंजिनसह EcoSport लाँच, जाणून घ्या फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 16:07 IST

फोर्ड इंडियानं नवी इकोस्पोर्ट्स (EcoSport) लाँच केली आहे.

नवी दिल्लीः फोर्ड इंडियानं नवी इकोस्पोर्ट्स (EcoSport) लाँच केली आहे. 2020मध्ये इकोस्पोर्ट्स BS6 इंजिनसह बाजारात आणली आहे. फोर्ड इंडियानं इकोस्पोर्ट्समधलं 1 लीटरचं इकोबूस्ट इंजिन बंद केलेले आहे. इकोस्पोर्ट्स पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. BS6 इंजिनच्या पेट्रोल आवृत्तीतल्या मॉडलची किंमत 8.04 लाख रुपये आहे. तसेच BS4 इंजिनच्या मॉडलची किंमत 7.91 लाख रुपयांच्या घरात आहे. नव्या इकोस्पोर्ट्सच्या पेट्रोल आवृत्तीच्या सुरुवातीच्या मॉडलची किंमत 13 हजार रुपयांनी वाढली आहे. तर 2020 इकोस्पोर्ट्सच्या टॉप-इंड मॉडल(Titanium+ ऑटोमॅटिक)च्या एक्स शोरूमची किंमत 11.43 लाख रुपये आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत BS6 पेट्रोल इंजिनचं टॉप इंड मॉडल 13 हजारांनी महागलं आहे.  BS6 डिझेल इंजिनच्या मॉडलची किंमत 8.54 लाखांच्या जवळपासBS6 डिझेल इंजिनसह येणार इकोस्पोर्ट्सची सुरुवातीच्या मॉडलची किंमत 8.54 लाखांच्या घरात आहे. तसेच BS6 डिझेल इंजिनच्या टॉप मॉडल(Titanium+ मॅन्युअल स्पोर्ट्स)ची किंमत 11.58 लाख रुपये आहे. BS6 डिझेल इंजिनची नवी कार जुन्या मॉडलच्या तुलनेत 13 हजार रुपयांनी महागली आहे.  BS6 इंजिनची नवी इकोस्पोर्ट्स स्टँडर्ड 3 वर्षं किंवा 100,000 किलोमीटरची फॅक्ट्री वॉरंटी देत आहे. इंजिनशिवाय या कारमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीच्या दाव्यानुसार, पेट्रोल इंजिन 15.9 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देत आहे. डिझेल इंजिन 21.7 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देतं. BS6 डिझेल इंजिनसह येणाऱ्या नव्या इकोस्पोर्ट्समध्ये 1.5 लीटर TDCi डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. जे 100 पीएस पॉवर आणि 215Nmचा टॉर्क निर्माण करतं. तसेच BS6 पेट्रोल इंजिनच्या नव्या इकोस्पोर्ट्समध्ये 3 सिलिंडरसह 1.5 लीटर Ti-VCT पेट्रोल इंजिन बसवण्यात आलं आहे, जे 122 PSची पॉवर आणि 149 Nmचं टॉर्क निर्माण करतं.इकोस्पोर्ट्समध्ये पेट्रोल इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. नव्या EcoSportमध्ये पहिल्यासारखंच एक्सटीरियर आणि इंटीरियरची झलक पाहायला मिळणार आहे. EcoSportच्या अनेक मॉडलमध्ये सनरूफचा पर्याय देण्यात आला आहे. चांगल्या सुरक्षेसाठी EcoSportमध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. यात SYNC 3 इंफोटेन्मेंट सिस्टम, 8 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. ऑटोमॅटिक HID हेडलॅप्स, डेटाइम रनिंग लाइट्स, इलेक्ट्रोक्रोमिक मिरर, रेन सेंसिंग वायपर्स आणि पुश-बटन स्टार्ट देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Fordफोर्ड