शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कार असो किंवा बाईक... इंश्युरन्स काढला नाही तर बसेल मोठा भुर्दंड! पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:01 IST

Car-Bike Insurance : तुमच्याकडे थर्ड-पार्टी इंश्युरन्स प्रूफ असेल, तरच तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल विकत घेता येईल.

Car-Bike Insurance : प्रत्येक वाहनांवर हल्ली इंश्युरन्स काढला आहे. जर तुम्हीही इंश्युरन्स काढला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची  आहे. नवीन नियमांनुसार, तुमच्याकडे वाहनांसाठी वॅलिड थर्ड-पार्टी इंश्युरन्स असलाच पाहिजे. अन्यथा तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल सुद्धा मिळणार नाही. फक्त पेट्रोल-डिझेलच नाही, तर FASTag साठी सुद्धा तुम्हाला इंश्युरन्स पेपर दाखवावे लागतील. म्हणजेच तुम्हाला तुमच्या वाहनाची वॅलिड थर्ड-पार्टी इंश्युरन्स पॉलिसी FASTag शी लिंक करावी लागेल. 

तुमच्याकडे थर्ड-पार्टी इंश्युरन्स प्रूफ असेल, तरच तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल विकत घेता येईल. तसेच, इतर बेनिफिट्सचा फायदा सुद्धा घेता येईल. जर, तुम्ही इंश्युरन्स पॉलिसीशिवाय रस्त्यावर गाडी चालवताना पकडला गेलात, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. कारण, सरकारने फ्यूल खरेदी म्हणजेच पेट्रोल-डिझेल, FASTag आणि पॉल्यूशन- लायसन्स सर्टिफिकेट घेण्यासाठी इंश्युरन्स प्रूफ दाखवणे अनिवार्य केले आहे.

थर्ड पार्टी इंश्युरन्स आवश्यकभारतात सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी इंश्युरन्स अनिवार्य करण्यात आला आहे. यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. तुमच्याकडे जर कार, बाईक-स्कूटर असल्यास इंश्युरन्स असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता देशातील रस्त्यांवर थर्ड पार्टी इंश्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदा असणार आहे. यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुमच्या वाहनामुळे होणाऱ्या नुकसानापासून थर्ड पार्टी इंश्युरन्स तुमचे संरक्षण करेल. 

काय सांगतो मोटर व्हीकल कायदा?मोटर व्हीकल कायद्यानुसार, रस्त्यावर धावणाऱ्या सर्व वाहनांच थर्ड-पार्टी इंश्यूरन्स कव्हर असले पाहिजे. सरकारने नवीन इंश्युरन्स विकत घेताना FASTag ला वॅलिड थर्ड-पार्टी इंश्युरन्स पॉलिसीसोबत जोडणे अनिवार्य केले आहे. यामुळे, पेट्रोल पंपावर व्हीकलमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरताना इंश्युरन्स काढलाय की, नाही ते चेक होईल. बऱ्याचदा FASTag सिस्टिमच्या माध्यमातून सर्व काही चेक केले जाते. त्यामुळे आता फास्टटॅगमध्येही इंश्युरन्सला जोडावे लागणार आहे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार