शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

FASTag Traffic Challan : फास्टॅग असला नसला तरी दंडाची पावती घरी येणार; नवा नियम डोकेदुखी वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:31 IST

FASTag New Rule: हा नियम गेल्या महिन्यात १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. गाडीवर फास्टॅग असला आणि नसला तरी तुम्हाला दंडाची पावती येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किती जरी टोलनाके हटविणार असल्याचे सांगत असले तरी ते सध्या तरी शक्य नाहीय. यामुळे रांगेत राहूनच टोल देत वाहने हाकावी लागणार आहे. या रांगांपासून मुक्ती मिळण्यासाठी चार वर्षांपूर्वी FASTag प्रणाली वापरात आली व गेल्या वर्षीपासून ती सक्तीची झाली. ज्याच्याकडे फास्टॅग नाही त्याला दुप्पट टोलही आकारण्यात येत आहे. परंतू त्याहूनही मोठा नियम करण्यात आला आहे. 

हा नियम गेल्या महिन्यात १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. गाडीवर फास्टॅग असला आणि नसला तरी तुम्हाला दंडाची पावती येणार आहे. १५ फेब्रुवारीपासून देशात प्रत्येक चारचाकीसह अन्य मोठ्या वाहनांवर फास्टॅग सक्तीचा करण्यात आला आहे. जरी फास्टॅग लावलेला असला तरी देखील दंडाची पावती फाडली जाण्याची शक्यता आहे. 

कारण फास्टॅग काचेवर लावलेला असला तरी तो अॅक्टिव्ह असला पाहिजे. यामुळे आम्ही टोल नाक्यांवरूवन जात नाही, किंवा ज्यांच्यापासून टोलनाके लांब आहेत व संबंधच येत नाही अशा कार, वाहनांवर देखील फास्टॅग लावणे बंधनकारक झालेले आहे. यामुळे जर तुमच्या कारला फास्टॅग लावलेला असेल तर तो आधी सक्रीय केलेला आहे का ते तपासा. 

कसे पकडणार...जर तुम्ही टोल नाक्यावरून गेला आणि जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल किंवा इनअॅक्टिव्ह असेल किंवा पुरेसे पैसे नसतील तर तुमचा वाहतूक पोलिसांचे सीसीटीव्ही काढतात तसा फोटो काढला जाईल. त्याची दंडाची पावती तुम्हाला ऑनलाईन पाठविली जाणार आहे. म्हणजे डबल टोल भरावा लागणार ते वेगळेच आणि वर दंडही आकारला जाणार आहे. यापेक्षा तो फास्टॅग घेतलेला बरा असे वाटू लागणार आहे.  

टॅग्स :Fastagफास्टॅगTrafficवाहतूक कोंडीtollplazaटोलनाका