भारताच्या पेट्रोल स्कूटरच्या बाजारात धुमाकूळ घालणारी अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रीक व्हर्जन अक्षरश: अपयशी ठरले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतू कंपनीने दोन्ही ईलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन थांबविले आहे. जेवढ्या बनविल्या त्याच्या निम्म्या स्कूटरही विकल्या गेल्या नाहीत. मोठी नामुष्की होंडावर आली आहे. कंपनी ईव्ही बाजाराची गरज ओळखण्यात अपयशी ठरली आहे.
Honda Activa Electric आणि QC1 भारतीय बाजारात येणार असे समजताच भल्या भल्या कंपन्यांची भंबेरी उडाली होती. परंतू, या स्कूटरची मागणी कमी होण्याची सर्वात महत्वाची बाब म्हणजे डिक्की ठरली आहे. ग्राहकांना छोटी पिशवी ठेवण्यासाठी देखील डिक्की देण्यात आली नव्हती. यामुळे जे लोक स्कूटर घेतात, त्यांची मूळ गरज ही डिक्की असते. महिलांची पर्स, पिशव्या, साहित्य, फाईल्स आदी गोष्टी या डिक्कीत ठेवल्या जातात. परंतू, होंडाने तीन न दिल्याने बहुतांशी ग्राहकांनी या स्कूटरकडे पाठ फिरविली आहे. याचा परिणाम असा झाला की होंडाची स्कूटरला गिऱ्हाईकच मिळाले नाही, यामुळे हजारो स्कूटर या होंड्याच्या कंपनीतच पडून राहिल्या आणि अखेरीस या स्कूटरचे उत्पादन बंद करण्याची वेळ कंपनीवर आली आहे.
कंपनीने ऑगस्टपासून दोन्ही मॉडेलचे उत्पादन थांबविले आहे. होंडासारख्या मोठ्या आणि विश्वसनीय ब्रँडकडून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा होती. विशेषतः, Activa या लोकप्रिय नावामुळे Activa e (एक्स-शोरूम किंमत ₹1.17 लाख) हिट होईल असे मानले जात होते. मात्र, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या दोन्ही स्कूटर्सच्या उत्पादनावर ब्रेक लागला आहे.
विक्रीची निराशाजनक आकडेवारीफेब्रुवारी ते जुलै २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत कंपनीने दोन्ही स्कूटर्सचे एकूण ११,१६८ युनिट्स तयार केले होत. परंतु, डीलर्सपर्यंत केवळ ५,२०१ युनिट्सच पोहोचू शकले. याचा अर्थ उत्पादित स्कूटर्सपैकी अर्ध्याहून अधिक युनिट्स अजूनही कंपनीकडे स्टॉक म्हणून पडून आहेत. बजाज, टीव्हीएस, एथर आणि ओलासारख्या कंपन्या याच सेगमेंटमध्ये दमदार फीचर्ससह आकर्षक उत्पादने देत आहेत. यामुळे होंडाच्या स्कूटर्सना ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
बॅटरी स्वॅपिंगची मर्यादाActiva e मध्ये बॅटरी स्वॅपिंगचे तंत्रज्ञान असले तरी, त्यासाठी मजबूत आणि व्यापक 'स्वॅपिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर' आवश्यक आहे. सध्या होंडा एकटीच ही सुविधा देत असल्याने, मर्यादित स्वॅपिंग स्टेशनमुळे ही योजना फोल ठरली आहे. Activa e फक्त मुंबई, बंगळूर आणि दिल्ली या तीन शहरांमध्येच उपलब्ध होती, तर QC1 (एक्स-शोरूम किंमत ₹90,000) सहा शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, पुणे आणि चंदीगड) उपलब्ध होती. मर्यादित शहरांमध्ये उपलब्धता असल्यामुळेही विक्रीवर परिणाम झाला.
विक्रीतील ही मंदी पाहता, होंडा कंपनीने सध्यासाठी या दोन इलेक्ट्रिक मॉडेल्सचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कंपनीला इन्व्हेंटरीचा भार कमी करता येईल आणि भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
Web Summary : Honda stopped Activa EV production due to dismal sales. Limited features, especially the missing storage, deterred buyers. Despite battery swapping, sales remained low, leading to a strategic production halt and future reassessment.
Web Summary : होंडा ने एक्टिवा ईवी का उत्पादन बिक्री में कमी के कारण रोक दिया। सीमित सुविधाओं, विशेष रूप से स्टोरेज की कमी ने खरीदारों को हतोत्साहित किया। बैटरी स्वैपिंग के बावजूद, बिक्री कम रही, जिससे उत्पादन रुका।