शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ईव्ही होऊ लागली स्वस्त! परवडणाऱ्या बॅटऱ्यांचा पर्याय मिळाल्याने दुचाकींच्या किमतीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 7:00 AM

इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांच्या किमती २० ते २५ हजार रुपयांनी (२५ टक्के) स्वस्त करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :  मागील दोन ते तीन महिन्यांत देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांच्या किमती २० ते २५ हजार रुपयांनी (२५ टक्के) स्वस्त करत आहेत. प्रवेश पातळीवरील मॉडेलांच्या किमती सुमारे १५ ते १७ टक्के कमी झाल्या आहेत.ईव्ही दुचाकी किफायतशीर बनवून विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कंपन्यांनी किमती कमी केल्या आहेत. ईव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्यांच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय कंपन्या घेत आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत.

पर्यायी बॅटऱ्याही उपलब्धइलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या लिथियम आयर्न बॅटऱ्यांना पर्याय म्हणून अन्य बॅटऱ्याही विकसित होत आहेत. त्यामुळे लिथियम आयन बॅटऱ्यांच्या किमती उतरण्यास मदत झाली आहे. 

पेट्रोल दुचाकीएवढ्या होतील किमती, तज्ज्ञांचा दावा‘फाडा’चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, अनेक पेट्रोल दुचाकी उत्पादक कंपन्या ई-दुचाकी क्षेत्रात उतरल्या आहेत. आपल्या मॉडेलांची संख्या ते वाढवीत आहेत. सध्या त्यांची हिस्सेदारी सुमारे ५ टक्के आहे. दोन ते तीन वर्षांत ती अनेक पटीने वाढेल. त्याबरोबर ई-दुचाकींच्या किमती पेट्रोल दुचाकींच्या पातळीवर येतील.

का स्वस्त होत आहेत बॅटऱ्या?ईव्ही बॅटरी तज्ज्ञ आणि ईव्ही ऊर्जाचे सीईओ संयोग तिवारी यांनी सांगितले की, भारतासह जगात अनेक देशांत लिथियमचे साठे सापडले आहेत. त्यामुळे ईव्ही बॅटरी निर्मिती क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वास धक्का बसला आहे. त्यामुळे बॅटऱ्यांच्या किमती कमी होत आहेत.

साठा निकाली काढण्याची घाईसूत्रांनी सांगितले की, ई-दुचाकी किमती कमी होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे मार्चअखेरपर्यंत वाहनांचे साठे कमी करण्याची कंपन्यांची घाई. साठे निकाली काढण्यासाठी कंपन्यांनी किमती कमी केल्या आहेत.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर