शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी खरे ठरले! एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एन्ट्री; या 'बड्या' शहरात होणार उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 08:14 IST

Tesla Electric Car: इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे. 'टेस्लाची 8 जानेवारीला नोंदणी करण्यात आली आहे.

अवघ्या काही दिवसांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेले दिग्गज उद्योजक एलन मस्क यांच्या इलेक्ट्रीक कार आता भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्लाने अधिकृतरित्या भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. टेस्लाने टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्राइवेट लिमिटेड (Tesla India Motors and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) या नावे रजिस्ट्रेशन केले असून भारतीय बाजारात लक्झरी इलेक्ट्रीक कारचे उत्पादन आणि विक्री करण्यात येणार आहे. 

इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे. टेस्ला बंगळुरुमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटद्वारे काम सुरु करणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले. 8 जानेवारीला नोंदणी करण्यात आली आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हीड जॉन फेंस्टीन कंपनीचे संचालक आहेत. तनेजा टेस्लाचे सीईओ आहेत. उर्वरीत दोघे संचालक पदावर आहेत. कंपनी भारतात मॉडेल ३ लाँच करण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत या कारची विक्री सुरु होऊ शकते. 

या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा - असे बोलले जाते, की टेस्ला कारची आयात चीनवरून करण्याची शक्यता आहे आणि त्या ऑनलाईनच विकेल. डिलरशिपच्या माध्यमाने कारची विक्री होणार नाही. या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा आहे. या कारमध्ये 500 किलोमीटरपर्यंतची रेंज आणि 162 किमी प्रति तासची टॉप स्पिड असेल. मात्र, यासंदर्भात कंपनीने अधिकृत भाष्य केलेले नाही.

गडकरींनी केले होते सुतोवाचनितीन गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर भाष्य केले. ते म्हणाले, अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्यांवर काम करत आहेत. ज्यांच्या गाड्यांची किंमती कमी होऊ शकते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या टेस्ला फार प्रगत आहे. टेस्ला विक्रीबरोबर आपल्या कामकाजाला सुरुवात करेल. यानंतर कारच्या बाबतीत लोकांचा प्रतिसाद पाहून ते गाड्यांच्या असेम्बल आणि उत्पादनानंदर्भात विचार करतील. एवढेच नाही, तर पुढील पाच वर्षांत भारत क्रमांक एकचे मॅन्युफॅक्चरिंग हब होईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Teslaटेस्लाAutomobileवाहनNitin Gadkariनितीन गडकरीBengaluruबेंगळूर