शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Electric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या! HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 16:03 IST

EV Charging Station On HP Petrol Pump: हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited ) आपल्या पंपांवर ईलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंगची सोय करणार आहे. एचपीसीएल (HPCL) सुरुवातीला देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी ग्राहकांना सीएनजी आणि ईलेक्ट्रीक वाहनांकडे (Electric Vehicles) वळविले आहे. मात्र, सीएनजी पंप (CNG) आणि इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन (EV Charging Station) नसल्याने अनेकजण या गाड्या घेण्यापासून कचरत आहेत. अनेकांच्या मनात चार्जिंग स्टेशन नाहीत, मग लांबच्या पल्ल्याला गेल्यावर किंवा मध्येच चार्जिंग संपल्यावर काय करायचे असा प्रश्न सतावत आहे. परंतू आता ईव्ही घेणाऱ्यांच्या मनातील ही भीती दूर होणार आहे. (HPCL will biuld charging Station on its Petrol Pumps.)

कारण हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited ) आपल्या पंपांवर ईलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंगची सोय करणार आहे. एचपीसीएल (HPCL) सुरुवातीला देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यासाठी एचचीने राज्यांद्वारे संचालित कन्वर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेड (CESL) सोबत हातमिळवणी केली आहे. हा करार पुढील १० वर्षांसाठी असून याद्वारे एचपीच्या रिटेल आऊटलेटचा वापर करण्यात येणार आहे. 

सीईएसएलचे एमडी महुआ आचार्य यांनी सांगितले की, तांत्रिक दृष्या चांगले चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी हा करार झाला आहे. परिवाहन क्षेत्राला डिकार्बनाईज करण्यासाठी याचा उपयोग होईल. एचपीसीएलकडे शहरांमध्ये चांगल्या जागा आहेत. शहरांमध्ये हे चार्जिंग स्टेशन कुठे आहेत, याची माहिती मिळण्यासाठी एक अॅप असणार आहे. तसेच एचपीसीएल कडून जाहिरातीसाठी देखील मदत घेतली जाणार आहे. महामार्ग, शहरे आधी ईव्ही चार्जिंग स्टेशन युक्त केली जाणार आहेत.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन