शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Tork Kratos EV Launched: ओलाला धोबीपछाड! Tork Motors ची इलेक्ट्रीक मोटरसायकल Kratos लाँच; रेंज जबरदस्त, किंमतही खूप कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 10:16 IST

Tork Kratos Price in Pune, Maharashtra: Tork Motors ने Kratos आणि Kratos R हे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. २६ जानेवारीपासूनच या बाईकची बुकिंग सुरु केली आहे.

ओला आणि सिंपल एनर्जी या दोन भारतीय कंपन्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या होत्या. आता प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Tork Motors ने भारतीय बाजारात इलेक्ट्रीक मोटरसायकल Kratos लाँच केली आहे. टॉर्क मोटर्सने या बाईकचे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. 

Tork Motors ने Kratos आणि Kratos R हे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत १.०२ लाख आहे.  ही किंमत दिल्ली एक्सशोरुम आहे, यामध्ये सबसिडीदेखील जोडलेली आहे. Tork Motors ने २६ जानेवारीपासूनच या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. पुण्यात या बाईकची किंमत १.०७ लाखांपासून सुरु होते. (Tork Kratos Price in Pune, Maharashtra)

या दोन्ही बाईकची डिलिव्हरी एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. याबाईक कंपनीच्या वेबसाईटवर केवळ ९९९ रुपये देऊन बुक करता येणार आहेत. नवीन टॉर्क क्रेटॉस ईव्हीला टप्प्याटप्प्याने भारतभर उपलब्ध केले जाणार आहे. सुरुवातीला ही बाईक पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, दिल्लीसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये लाँच केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात ही बाईक अन्य शहरांमध्ये उपलब्ध केली जाईल. 

बॅटरी आणि रेंज...मोटरसायकलमध्ये 48V ची IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज १८० किमी आहे. तर रिअल वर्ल्ड रेंज ही १२० किमी आहे. ही मोटरसायकल १०० किमी प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. यामध्ये एक्सियल फ्लक्स टाइप इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. चार सेकंदांत ही मोटरसायकल 0-40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. Kratos R मध्ये अधिक क्षमतेची मोटर आहे. याचा टॉप स्पीड 105 kmph आहे. फास्ट चार्जिंग सुविधा केवळ Kratos R मध्ये देण्यात आली आहे. तसेच जियोफेंसिंग, फाइंड माई व्हीकल फीचर, मोटरवॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड, ट्रॅक मोड आदी देण्यात आले आहेत.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर