शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Electric Car : या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 17:37 IST

Best Selling Electric Car Brands: देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. Tata Motors, MG आणि Hyundai शिवाय, महिंद्रा आणि BYD सारख्या कंपन्याही आता या स्पर्धेत उतरल्या आहेत.

देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. Tata Motors, MG आणि Hyundai शिवाय, महिंद्रा आणि BYD सारख्या कंपन्याही आता या स्पर्धेत उतरल्या आहेत. महिंद्राने नुकतीच आपली पहिली इलेक्ट्रिक SUV XUV400 सादर केली आहे, ही गाडी जानेवारी 2023 पासून विकण्यास सुरूवात होण्याची शक्यता आहे. यातच एक कंपनी अशी आहे, जिने इलेक्ट्रिक कार विक्रीच्या बाबतीत इतर सर्व कंपन्यांना मागे टाकले आहे. तर, जाणून घेऊयात ऑगस्त 2022 मध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकणाऱ्या 5 कंपन्यांसंदर्भात.

छप्पर फाड विकल्या गेल्या या कंपनीच्या इलेक्ट्रिक कार - ऑगस्ट 2022 मध्ये, टाटा मोटर्स पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रिक कार निर्माता बनली आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 2,747 युनिट्सची विक्री केली. टाटा मोटर्स भारतात Nexon EV Prime, Nexon EV Max, Tigor EV सारख्या मॉडेल्सची विक्री करते. यांपैकी नेक्सॉन ईव्ही ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीने केवळ 575 युनिट्सचीच विक्री केली होती. याचा विचार करता, आता टाटा मोटर्सने तब्बल 377.74% वार्षिक वृद्धी नोंदवली आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीची टाटा टिगोर ईव्ही ही देशातील सर्वात स्वस्त पॅसेंजर इलेक्ट्रिक कार आहे. टॉप 5 कंपन्या अशा -लिस्टमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर MG ZS EV आणि Hyundai Kona यांचा क्रमांक लागतो. यांचे अनुक्रमे 311 यूनिट्स आणि 69 यूनिट्स विकले केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत MG ZS EV ची विक्री 17 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर ह्युंदाई कोनाची विक्री 475 टक्क्यांनी वाढली आहे. याप्रमाणे, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर BYD E6 आणि BMW iX/ BMW i4 आहेत. यांचे अनुक्रमे 44 यूनिट्स आणि 25 यूनिट्स विकले गेले आहेत.

टॅग्स :TataटाटाHyundaiह्युंदाईMahindraमहिंद्राMG Motersएमजी मोटर्स