शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Electric Car, Scooter Price Hike: नितीन गडकरींचा दावा फोल ठरणार? इलेक्ट्रीक स्कूटर, कारच्या किंमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 16:57 IST

Electric Car Scooter And Bike Price hike soon: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच इलेक्ट्रीक कारच्या किंमती कमी होणार असल्याचे म्हणजेच पेट्रोल, डिझेल गाड्यांएवढ्या होणार असल्याचे म्हटले होते.

भारतात इलेक्ट्रीक कार आणि स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. यामुळे गेल्या काही काळापासून नवनवीन कंपन्यांनी इलेक्ट्रीक कार (Electric Cars),  स्कूटर (Electric Scooter) लाँच करण्याचा किंवा घोषणा करण्याचा सपाटाच लावला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ग्राहकवर्ग नव्या पर्यायाकडे वळला आहे. परंतू, एकीकडे इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी होत असताना दुसरीकडे या वाहनांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Electric Vehicles Price Hike) 

मागणी वाढू लागल्याने इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरले जाणारे लिथिअम आयनची (Lithium ion Battery) मत वाढू लागली आहे. यामुळे नववर्षात पेट्रोल, डिझेलच्या वाहनांबरोबरच इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे. 

सध्या मारुती, टाटा, ऑडी सारख्या कंपन्यांनी 2022 मध्ये दरवाढ करण्याची घोषणा आताच केलेली आहे. म्हणजेच 1 जानेवारीपासून पेट्रोल, डिझेलच्या कारच्या किंमती वाढविण्यात येतील. यामागे खर्च वाढल्याचे कारण कंपन्यांनी दिले आहे. गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर स्कूटर, कारच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे जर तुम्ही पुढील काळात इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच इलेक्ट्रीक कारच्या किंमती कमी होणार असल्याचे म्हणजेच पेट्रोल, डिझेल गाड्यांएवढ्या होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, हे कधी होईल हे सध्या तरी कोणी सांगू शकत नाहीय. युकेच्या एनालिटिक्स आणि कंसल्टिंग फर्म Global Data ने याबाबतचा अंदाज वर्तविला आहे. कंपन्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ईव्हींचा विस्तार करणार आहेत. परंतू, त्यांना लिथिअम आयन बॅटरींची किंमत वाढण्याचाही विचार करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. 2024 पर्यंत लिथिअम आयनच्या किंमतीमध्ये 40 टक्क्यांची वाढ होऊ शकते. यामुळे भविष्यात ईव्हीच्या किंमती वाढणार आहेत.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनFuel Hikeइंधन दरवाढ