शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

ईलेक्ट्रीक कारची विक्री १४ टक्क्यांनी वाढली, पण टाटाची घसरली; एमजी बाजी मारणार, त्यात महिंद्रा येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:34 IST

EV Car, Suv Sale: गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक कार आणि एसयुव्हींच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांत पहिल्या नंबरवर असलेल्या टाटाला एमजी मोटर्सकडून मोठी स्पर्धा मिळत आहे.

महागाई, चढ्या व्याजदरांमुळे वस्तूंचे उत्पादन वाढले तरी मागणी कमी झाल्याने देशाचा जीडीपी कमालीचा घसरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री मोठ्या संकटातून जात आहे. टाटासह अनेक कंपन्यांच्या कारची विक्री होत नाहीय, अनेक कार गोदामांमध्येच पडून आहेत. यासाठी कंपन्या लाखोंचा डिस्काऊंट देत आहेत. तरीही ग्राहक मिळत नाहीय अशी अवस्था झाली आहे. याचा फटका पाण्यासारख्या विकल्या जाणाऱ्या ईव्ही वाहनांना बसलेला नसला तरी टाटाला मात्र बसला आहे. 

गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक कार आणि एसयुव्हींच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांत पहिल्या नंबरवर असलेल्या टाटाला एमजी मोटर्सकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. एमजीची विंडसर ईव्ही गेमचेंजर ठरू लागली असून तिची विक्री वाढल्याने टाटाची विक्री घसरली आहे. यातच येत्या दोन महिन्यांत महिंद्राच्या ईव्ही कार देखील धुमाकुळ घालण्यास सुरुवात करणार असल्याने सर्व्हिसच्या बाबततीत यथातथाच असलेल्या टाटाला मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. 

नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी जास्त ईलेक्ट्रीक कार विकल्या गेल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये ७५३९ कार विकल्या गेल्या होत्या, त्या २०२४ मध्ये याच महिन्यात ८६९६ एवढ्या विकल्या गेल्या आहेत. 

टाटाची आकडेवारी पाहिली तर नोव्हेंबर २०२३ मध्ये ५१२४ कार विकल्या गेल्या होत्या, तर नोव्हेंबर २०२४ मध्ये ४१९६ कार विकल्या गेल्या आहेत. जवळपास १८ टक्क्यांनी ही विक्री घटली आहे. ऑक्टोबर २०२४ शी तुलना करायची झाल्यास ही २२०० पेक्षा जास्त घट आहे. ऑक्टोबरमध्ये ६४४९ कार विकल्या गेल्या होत्या. महत्वाचे म्हणजे टाटाने नुकतीच कर्व्ह ईव्ही लाँच केली होती. परंतू, ती टाटाला बूस्ट देऊ शकलेली नाही. 

एमजीने नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपेक्षा तिप्पटीने जास्त कार विकल्या आहेत. यात विंडसरचा वाटा मोठा आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये एमजीने ९५६ कार विकल्या होत्या. यंदा एमजीने नोव्हेंबरमध्ये ३१२६ कार विकल्या आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरTataटाटाMG Motersएमजी मोटर्स