शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
4
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
5
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
6
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
9
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
10
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
11
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
12
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
13
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
14
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
15
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
16
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
17
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
18
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
19
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
20
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  

इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:13 IST

२०२८ पर्यंत भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचे आकडे नव्या उंचीवर जाणार; महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने प्रोत्साहन दिल्याने झाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात इलेक्ट्रिक कार विक्रीचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत २१ पट वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जवळपास ५ हजार इलेक्ट्रिक कार्स विकल्या गेल्या, तर गेल्या आर्थिक वर्षात ही संख्या १,०७,००० हून अधिक झाली आहे. इलेक्ट्रिक कार विक्रीचे प्रमाण २०२८ पर्यंत ७% पेक्षा अधिक होईल, असा अंदाज केअरएज ॲडव्हायजरीने व्यक्त केला आहे. नवीन मॉडेल लाँचेस, सरकारी प्रोत्साहन योजना आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढ यामुळे ही घोडदौड अधिक वेगाने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकूण ईव्ही विक्रीत इलेक्ट्रिक चारचाकीचा वाटा अजूनही कमी आहे. दुचाकी, तीन चाकी वाहनांवर अधिक भर दिला जात आहे. पण आता चार चाकी वाहनांची विक्री वेगाने वाढत आहे. ईव्ही घेण्याचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने का वाढली?

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे इलेक्ट्रिक वाहनांसाठी केंद्रस्थानी.

१,९९५ कोटी रुपयांचा प्रोत्साहन भत्ता; २० लाखांपर्यंत बससाठी अनुदान.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी; प्रत्येक २५ किमीवर चार्जिंग स्टेशन

३,७४६ चार्जिंग स्टेशन एकट्या महाराष्ट्रात आहेत. प्रथम स्थानी कर्नाटक असून येथे ५,८८० चार्जिंग स्टेशन आहेत.

२६,००० चार्जिंग स्टेशन

ईव्ही घेण्याचा विचार करणाऱ्यांसमोर मोठा अडथळा हा चार्जिंग सुविधांचा होता. मात्र, गेल्या तीन वर्षांत यात प्रगती झाली आहे.  २०२५ मध्ये चार्जिंग स्टेशन २६,००० च्या पुढे गेले आहेत. 

काही कंपन्या देखील घरगुती चार्जर आणि फास्ट चार्जिंग कॉरिडॉर उभारण्यावर भर देत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

किमती कमी होणार : इलेक्ट्रिक वाहनाच्या किमतीत बॅटरीचा वाटा ३५ ते ४५% असतो. सध्या भारत १००% लिथियम आयन बॅटरी सेल आयात करतो. परंतु २०२७ पर्यंत हे प्रमाण २०%वर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे बॅटरीची किंमत २०-२५% कमी होईल

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार