शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

E-Scooter च्या प्रेमात आहात? स्कूटरमधून आधी खूप धूर निघाला, नंतर पेट घेतला; धक्कादायक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 15:05 IST

E-Scooter caught fire: तसे पाहिल्यास पेट्रोल, सीएनजीच्या कार देखील आग पकडतात. परंतू त्याचे प्रमाणही किरकोळ आहे. सध्या लोकांमध्ये एक वेगळी क्रेझ आहे ती इलेक्ट्रीक गाड्यांची. मग पहा हा व्हिडीओ....

देशात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी वाढू लागली आहे. गेल्याच महिन्यात ओला, सिंपल वनच्या स्कूटर लाँच झाल्या आहेत. तर टाटासारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक कारदेखील बाजारात मोठ्या वेगाने विकल्या जात आहेत. लोकही पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहून इलेक्ट्रीक वाहनांकडे वळत आहेत. परंतू ही इलेक्ट्रीक वाहने किती सुरक्षित आहेत याबाबत कोणालाच अंदाज नाहीय.(E-Scooter caught fire on Road side park. video went viral.)

तसे पाहिल्यास पेट्रोल, सीएनजीच्या कार देखील आग पकडतात. परंतू त्याचे प्रमाणही किरकोळ आहे. सध्या लोकांमध्ये एक वेगळी क्रेझ आहे ती इलेक्ट्रीक गाड्यांची. चांगल्या कंपन्यांच्या गाड्या या चांगले मटेरिअल वापरून बनविलेल्या असतात. तशी त्यांची किंमतही असते. परंतू कमी किंमतीत लाँच होणाऱ्या गाड्यांची किंमत कमी ठेवण्यासाठी क्वालिटीमध्ये काँप्रोमाईज केलेले असते. मोठमोठ्या कंपन्यादेखील स्पर्धेतून किंमत कमी ठेवण्यासाठी क्वालिटीमध्ये फेरफार करतात, नाही असे नाही. परंतू सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो इलेक्ट्रीक स्कूटर घेणाऱ्यांसाठी नक्कीच विचार करायला लावणारा आहे. 

आपण नेहमी पाहतो, मोबाईलचा स्फोट झाला, चार्जर फुटला तसेच घरातील अनेक उपकरणे स्फोट होऊन खराब झाली, जळाली. तसाच काहीसा प्रकार या इलेक्ट्रीक स्कूटरबाबत घडला आहे. रस्त्याशेजारी लावण्यात आलेली इलेक्ट्रीक स्कूटर जळाली आहे. साधारण १.५१ मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये एक इलेक्ट्रीक स्कूटर रस्त्या कडेला उभी असल्याचे दिसत आहे. त्याची सीट वर केलेली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघत आहे. काही लोक स्कूटरजवळ जाऊन सीट बंद करतात. मात्र, धूर काही थांबत नाही. सीट पुन्हा उचलली जाते, पाहता पाहता पांढऱ्या धुराचे आगीत परिवर्तन होते. यामुळे लोक घाबरून दूर पळतात. 

हा व्हिडीओ, कधीचा आहे, कुठला आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. @in_patrao या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनfireआग