शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:49 IST

RBI Repo Rate: जर तुम्ही नवीन व्याजदराने बँकेकडून कर्ज घेतले किंवा जुन्या कर्जावर व्याजदर कपात करायला लावली तर तुम्ही व्याजावर खूप पैसे वाचवू शकणार आहात.

रिझर्व्ह बँकेने बँकांना देत असलेल्या कर्जावरील म्हणजेच रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे हा रेपो रेट ५.५० टक्के झाला आहे. म्हणजेच बँकांना आरबीआयला कमी दराने व्याज द्यावे लागणार आहे. याचाच फायदा ग्राहकांनाही होणार आहे. ग्राहकांनो हा फायदा एकेरी नाही तर दुहेरी लाभ उचलू शकता, कसे ते पाहुया...

जर तुम्ही नवीन व्याजदराने बँकेकडून कर्ज घेतले किंवा व्याजदर कपात करायला लावली तर तुम्ही व्याजावर खूप पैसे वाचवू शकणार आहात. उदा. तुम्ही २० लाखांचे कर्ज २० वर्षांसाठी घेतले असेल तर तुम्ही व्याजापोटी द्यावे लागणार असलेले 1.48 लाख रुपये वाचवू शकणार आहात. हे १.४८ लाख रुपये तुम्ही दुसरीकडे कुठेतरी वापरून त्यातूनही पैसे वाचवू किंवा कमवू शकता. 

कुठेतरी गुंतविले तर तुम्हाला ७ ते ८ टक्के व्याज मिळू शकते. परंतू, त्याहून अधिक फायदा हवा असेल तर तुम्ही तुमच्यासाठी ईलेक्ट्रीक स्कूटर, बाईक घेऊ शकता. आज १.२० ते दीड लाखापर्यंत चांगल्या रेंजच्या इलेक्ट्रीक स्कूटर किंवा मोटरसायकल मिळतात. जर तुमच्याकडे पेट्रोल स्कूटर किंवा बाईक असेल तर वापरले जाणारे पेट्रोलही तुम्ही वाचवू शकता. आहे का नाही दुहेरी फायदा...

जर तुम्हाला नवीन स्कूटर घ्यायची असेल, रनिंग जास्त आहे यामुळे सध्या आहे ती पेट्रोल दुचाकी परवडत नाहीय तर मग तुम्ही तिच्या ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर, मोटरसायकल घेऊ शकता. तसेच पेट्रोलवरील दर महिन्याचा होणारा खर्च वाचवू शकता. आता ही स्कूटर कर्जावर घेतली तरी देखील थोडे गणित बदलले तरी तुम्ही बऱ्यापैकी पैसे वाचवू शकणार आहात. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर