शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

किया मोटर्स भारतात करणार दणक्यात एंट्री, पाहा कधी होणार ही एसयूव्ही कार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 07:30 IST

दक्षिण कोरियातील प्रमुख कार उत्पादन कंपनी असलेली किया मोटर्स लवकरच स्वतःची पहिली-वहिली कार भारतात लाँच करणार आहे.

जयपूर- दक्षिण कोरियातील प्रमुख कार उत्पादक कंपनी असलेली किया मोटर्स लवकरच स्वतःची पहिली-वहिली कार भारतात लाँच करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दणक्यात किया मोटर्स साधीसुधी नव्हे, तर एसयूव्ही प्रकारातली कार लाँच करून धडाका उडवून देणार आहे. किया मोटर्स इंडिया(केएमआई)चे मार्केटिंग प्रमुख मनोहर भट्ट यांनी ही माहिती दिली आहे.कंपनीनं भारतात पहिली कार लाँच केल्यानंतर येत्या तीन-चार वर्षांनी आणखी वेगळ्या प्रकारातील कार भारतीय बाजारात दाखल करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी छोट्या गाड्याही लाँच करू शकते, परंतु कंपनीचा जास्त मागणी असलेल्या कार बनवण्याकडे कल आहे. कंपनीनं सध्या कारच्या डीलर नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. आंध्र प्रदेशमधल्या अनंतपूरमध्ये कंपनीच्या प्रस्तावित कारखान्याचं काम जोरात सुरू आहे. कंपनीला येरामांची गावात 535 एकर जमीन मिळाली आहे. तिथे गाड्या बनवण्याचं काम सुरू होणार आहे.भट्ट म्हणाले, कंपनीची भारतात जवळपास 1.1 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक यांग एस किम यांनीही प्रस्तावित कारखान्यात लवकरच कार तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचंही सांगितलं आहे. एका प्रश्नाच्या उत्तरादाखल भट्ट म्हणाले, वाहन उत्पादन कंपन्यांसमोर मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे वाहन निर्मिती आणि विक्रीमध्ये ताळमेळ राखता आला पाहिजे. कोरियन कंपनी असलेली किया भारतातल्या कार बाजारात लवकरच स्वतःचं अढळ स्थान निर्माण करेल, अशी आशा आहे.  

टॅग्स :Automobileवाहनcarकार