शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नो टेन्शन! आता दिल्लीत १० वर्षे जुनी वाहने जप्त होणार नाहीत, वाचा 'हा' नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 13:35 IST

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता घरांबाहेर रस्त्यांवर पार्क केलेली अशी वाहने जप्त केली जाणार नाहीत.

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये स्क्रॅप पॉलिसी (Scrap Policy) लागू झाल्यापासून १० वर्षे जुन्या डिझेल किंवा १५ वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांचे मालक चिंतेत आहेत. रस्त्यावर व घरांच्या बाहेर उभी केलेली अशी वाहने स्क्रॅपसाठी उचलण्याची भीती होती. मात्र, आता दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाकडून मोठी बातमी येत आहे.

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत (Kailash Gehlot) यांच्याकडून परिवहन आयुक्तांना आदेश देण्यात आला आहे की, हा कालावधी ओलांडलेली वाहने स्क्रॅपसाठी उचलण्यात येऊ नयेत. या आदेशानंतर जुन्या वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता घरांबाहेर रस्त्यांवर पार्क केलेली अशी वाहने जप्त केली जाणार नाहीत.

दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाच्या अंमलबजावणी शाखेमार्फत अशी वाहने स्क्रॅपसाठी उचलण्याचे काम सुरू होते. मात्र आता ही वाहने उचलली जाणार नाहीत. मात्र, परिवहन आयुक्त आशिष कुंद्रा यांना दिलेल्या आदेशात ही वाहने रस्त्यावर फिरताना दिसली आणि पकडली गेली, तर त्या वाहनांना हा नियम लागू होणार नाही, असे म्हटले आहे.

थोडक्यात जाणून घ्या स्क्रॅप पॉलिसी?केंद्र सरकारने लागू केलेल्या स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत ज्या वाहनाची विहित मुदत पूर्ण झाली आहे किंवा ते वाहन रस्त्यावर चालवले जात आहे, तेच वाहन स्क्रॅपसाठी उचलले जाऊ शकते. रस्त्यावर उभी असलेली वाहने, जी निरुपयोगी झाली आहेत किंवा प्रदूषण करणारी वाहने उचलली जाऊ शकतात. मात्र, स्क्रॅपिंग एजन्सी चांगल्या स्थितीत असेलेली वाहने उचलू शकत नाही.

टॅग्स :Automobileवाहनdelhiदिल्ली