शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

वाहने होणार महाग; पर्यावरण करात दुपटीने वाढ, प्रदूषण रोखण्यासाठी कडक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 06:37 IST

पेट्रोलवरील हलके मोटार वाहन, डिझेल कारच्या वाहनांवरील पर्यावरणकरात वाढ

पुणे : जुन्या वाहनांचा वापर कमी करून वाढते प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने, पर्यावरणपूरक वाहनांना चालना देण्यासाठी येत्या (दि. १ एप्रिल) बुधवारपासून पर्यावरण करात दुपटीने वाढ होणार आहे. दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर दोन हजार रुपयांवरून वाढवून चार हजार रुपये करण्यात आला आहे, तर पेट्रोलवरील हलके मोटार वाहन, डिझेल कारच्या वाहनांवरील पर्यावरणकरात वाढ होणार आहे.

जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होऊ नये, यासाठी परिवहन विभागामार्फत २०१० पासून पर्यावरण कर आकारला जात आहे. हा पर्यावरण कर भरून घेताना त्या वाहनामुळे प्रदूषण होत नाही ना, याची खात्री करून घेतली जाते. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठीचे निकष ते पूर्ण करीत असेल, तरच हा कर भरून घेतला जातो. मात्र, आता जुन्या आणि प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवरील पर्यावरण करात दुप्पटने वाढ करण्यात आली आहे.

व्यावसायिक वाहनांना १५ वर्षानंतर फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर दर पाच वर्षानी एकरकमी पर्यावरण कर भरावा लागतो. वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी परिवहन विभागाने पर्यावरण कर दुप्पट केले आहे.

राज्य सरकारने पंधरा वर्षांवरील वाहनांची ग्रीन टॅक्सची रक्कम दुप्पट पद्धतीने वाढ केली आहे. दुचाकी, चारचाकी त्याच प्रमाणात टेम्पो, ट्रक, बस यांच्याही ग्रीन टॅक्समध्ये वाढ केलेली आहे. दुचाकीसाठी ४ हजार रुपये तर चारचाकी वाहनासाठी ७ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्व प्रकारच्या वाहनचालकांचा आर्थिक बोजा हा वाढणार आहे. या वाढीव कराबद्दल आम्ही सरकारचा निषेध करीत आहोत. डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य वाहन मालक-चालक महासंघ 

English
हिंदी सारांश
Web Title : Vehicle prices to rise: Environmental tax doubles to curb pollution.

Web Summary : Maharashtra doubles environmental tax on vehicles from April 1st to curb pollution and promote eco-friendly transport. Two-wheelers now pay ₹4,000, cars face increased rates. Commercial vehicles also see higher green tax after 15 years, prompting protests.
टॅग्स :carकारPuneपुणेpollutionप्रदूषण