इथेनॉल मिश्रित पेट्रोलने सर्वांच्या डोक्याला झिनझिन्या आणल्या आहेत. गाड्या नादुरुस्त होणे, मेंटेनन्स जास्त निघणे असे प्रकार घडू लागले आहेत. वाहन कंपन्यांनी सुद्धा जर तुमची गाडी मग ती दुचाकी असो की चारचाकी इथेनॉलला सपोर्ट करणारी नसेल तर चुकीचे इंधन घालू नका असे बजावलेले आहे. परंतू, गत्यंतर कोणाकडे आहे. कारण सरकारच सर्व पेट्रोल पंपांवर फक्त ई २० वाले पेट्रोल विकत आहे. अशातच या ई २० पेट्रोलचा सर्वाधिक फटका हा सीएनजी वाल्या कारमध्ये बसणार आहे.
पेट्रोलच्या खर्चापासून वाचण्यासाठी अनेकजण सीएनजीवरील कार घेतात. नेहमी सीएनजीवरच कार चालवितात. परंतू, अनेकजण इमरन्सी म्हणून गाडीच्या टाकीत ४-५ लीटर पेट्रोल टाकून ठेवतात. ते तसेच बरेच आठवडे असते. इथेच खरा फटका पडतो.
इथेनॉल हे हवेतील पाणी किंवा पाण्याच्या थेंबासोबत मिसळणारे आणि वाढणारे रसायन आहे. यामुळे जास्त दिवस पेट्रोल तसेच टाकीत ठेवल्यास टाकीत गंज लागण्याचा धोका वाढत आहे. हे सीएनजीच नाही तर त्यांच्या कार पेट्रोलच्या आहेत आणि आठवडा आठवडा पार्किंगमध्येच उभ्या असतात त्यांनाही धोक्याचे आहे. तसेच पाणी इंजिनमध्ये जाऊ लागल्याने इंजिनही बंद पडण्याची शक्यता आहे.
काय करावे...जर तुमच्या कारच्या टाकीत जास्त काळ पेट्रोल असेल तर काढून घ्यावे, थोड्या थोड्या काळाने कार पेट्रोलवर वापरत रहावी. काही पेट्रोल पंपांवर इथेनॉल नसलेले पेट्रोल मिळते, जरा महाग आहे परंतू सीएनजी संपला तर इमरजन्सीला लागेल तर ते टाकावे.