शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

Citroen C3: परवडणाऱ्या फ्लेक्स फ्युअलवर Citroen पहिली कार आणणार; किंमतही नेक्सॉनएवढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 15:30 IST

Citroen C3 India's first flex fuel car: Citroen ने भारतात आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँचिंगचे इन्वाईट पाठविले आहे. यामध्ये लिहिले आहे की, 16 सप्टेंबरला Citroen C3 Compact SUV अनईव्हिल केली जाईल.

Citroen C3 Compact SUV India Launch Price Features: फ्रान्सची पॉप्युलर ऑटोमोबाईल कंपनी Citroen ने भारतात काही महिन्यांपूर्वी Citroen C5 Aircross SUV लाँच केली आहे. यानंतर त्यापेक्षा छोटी कॉम्पॅक्ट एसयुव्ही Citroen C3 लाँच करणार आहे. येत्या 16 सप्टेंबरला यावरून पडदा उठेल. (Citroen C3 Compact SUV India Launch soon; 10 lakhs price, flex fuel.)

ही कार अमेरिका, युरोपच्या बाजारातही याच दिवशी लाँच केली जाणार आहे. सिट्रोएन सी3 भारतात 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. यामुळे ही कार Tata Nexon, Kia Sonet, Maruti Brezza आणि Hyundai Venue सारख्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीला टक्कर देणार आहे. 

Citroen ने भारतात आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँचिंगचे इन्वाईट पाठविले आहे. यामध्ये लिहिले आहे की, 16 सप्टेंबरला Citroen C3 Compact SUV अनईव्हिल केली जाईल. या एसयुव्हीचे उत्पादन भारतातच करण्यात येणार असून पुढील वर्षी 2022 पासून ती बाजारात विक्रीसाठी उतरवली जाईल. Citroen C5 Aircross ची सध्या विक्री केल जात आहे, मात्र याची किंमत खूपच जास्त आहे. सिट्रोएनने दर महिन्याला 2,750 युनिट Citroen C3 च्या उत्पादनाचा प्लॅन आखला आहे. दर वर्षी 33,000 युनिट बनविली जाणार आहेत. या वर्षी डिसेंबरमध्ये याचे उत्पादन सुरु होईल. 

Citroen C3 compact SUV ची स्केल मॉडेल इमेज आधीच समोर आली आहे. यामध्ये ही कार खूप स्पोर्टी आणि स्टायलिश दिसत आहे. Citroen C3 Aircross आणि Citroen C5 Aircross या दोन धांसू कारची झलक या कारमध्ये दिसू शकते. यामध्ये सिग्नेचर वाइड ग्रिल, ड्युअल लेयर हेडलँप, अँग्युलर विंडशील्ड, फ्लॅट रूफसोबत बंपर आणि रुफवर ऑरेंज लेयर आणि ड्युअल टोन डायमंड कट अलॉय व्हील देण्यात येतील. यामध्ये यूजर्स कंफर्ट पाहिला जाणार आहे. 

Citroen C3 compact SUV मध्ये 8 इंचाची फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3 इंचाची डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील सारखे फिचरसोबत 1.2 लीटरचे टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन 130bhp ची ताकद प्रदान करेल. 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि DCT ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिला जाईल. भारतातील ही पहिली Flex-Fuel system ची कार असू शकते.  

टॅग्स :Citroen Indiaसिट्रॉन